पंढरपूर : श्री विठ्ठल-रुक्मिणीबीव्हीजी कंपनीकडून सुरक्षा रक्षकांना चिकन मसाल्याच्या पॅकेटचे वाटप करणे हे आक्षेपार्ह आहे. या घटनेबाबत मंदिर समितीकडून बीव्हीजी कंपनीला नोटीस बजावण्यात आली आहे. निश्चितीच त्यावर कारवाई करण्यात येईल.
मंदिर समितीस खासगी सुरक्षा रक्षक पुरवण्याचा ठेका बीव्हीजी कंपनीकडे आहे. त्या सुरक्षा रक्षकांना कंपनीकडून दिवाळीनिमित्तच विविध पदार्थांचे गिफ्ट देण्यात आले. यामध्ये चिकन मसाला असा उल्लेख असलेले पाकीटदेखील आहे. त्यामुळे भाविकांतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या अगोदरही बीव्हीजी कंपनीच्या खासगी सुरक्षारक्षकांकडून आषाढी यात्रेत दर्शन रांगेतील भाविकांना बेदम मारहाण केल्याचे प्रकार घडलेले आहेत. त्यानंतर आता त्याच कंपनीकडून मंदिराचे पावित्र्य धुळीस मिळवण्याचा प्रकार समोर आला आहे…
मंदिर समितीस सुरक्षा रक्षक पुरवणार्या बीव्हीजी कंपनीकडून दिवाळी सणानिमित्त गिफ्ट म्हणून विविध पदार्थ देण्यात आले आहेत. यामध्ये चिकन मसाला पॅकेटही देण्यात आले. देवाच्या दारात आक्षेपार्ह जिन्नसांचे पॅकेट वाटप करण्यात आल्यामुळे भाविकांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीकडून बीव्हीजी कंपनीला नोटीस देण्यात आली.
राजेंद्र शेळके, कार्यकारी अधिकारी, विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समिती
बीव्हीजी कंपनीने कर्मचार्यांना चिकन मसाला वाटप करणे, ही चुकीची घटना आहे; मात्र एक आहे की, कुठलाही मसाला हा मांसाहारी नसतो. तो शाकाहारीच असतो, तरीही ही घटना चुकीचीच आहे. याबाबत बीव्हीजी कंपनी व मंदिर समितीने काळजी घेतली पाहिजे.
जयकुमार गोरे, पालकमंत्री
बीव्हीजी कंपनीकडून कर्मचार्यांना दिवाळी गिफ्ट म्हणून विविध पदार्थांच्या पॅकेटचे गिफ्ट देण्यात आले. यात चिकन मसाला पॅकेट देण्यात आले आहे. हे मसाला पॅकेट मांसाहारी नाही, तरीदेखील भाविकांच्या भावना लक्षात घेत वाटप थांबवले आहे.
कैलास देशमुख, समन्वयक,बीव्हीजी








