सोलापूर : : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, मुंबई विभागीय मंडळाच्या वतीने घेण्यात येणारी इयत्ता दहावीची (SSC) भूगोल विषयाची परीक्षा उद्या, नियोजित वेळापत्रकानुसारच पार पडणार आहे. यासंदर्भात विभागीय पुणे बोर्डाची अध्यक्ष राजेंद्र अहिरे यांनी अधिकृत सूचना निर्गमित केल्या आहेत.
शिक्षण मंडळाने स्पष्ट केले आहे की, उद्याच्या पेपरच्या तारखेत किंवा वेळेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. परीक्षेच्या सुलभ संचालनासाठी मुंबई विभागीय मंडळाच्या अख्त्यारित येणाऱ्या सर्व केंद्र संचालकांना आणि परिरक्षकांना (Custodians) आवश्यक सूचना आजच देण्यात आल्या आहेत.भूगोल विषयाचा पेपर ठरलेल्या वेळेनुसारच सुरू होईल.सर्व केंद्र संचालकांनी आपापल्या केंद्रावर परीक्षेची तयारी पूर्ण ठेवावी आणि कोणत्याही तांत्रिक अडचणी येणार नाहीत याची दक्षता घ्यावी.आणि विद्यार्थ्यांनी कोणत्याही सोशल मीडियावरील अफवांना बळी पडू नये. आपले हॉल तिकीट आणि आवश्यक साहित्यासह परीक्षा केंद्रावर वेळेत उपस्थित राहावे.
असे विभागीय मंडळाने सर्व स्तरावर समन्वय साधला असून, विद्यार्थ्यांनी निर्भयपणे परीक्षेला सामोरे जावे, असे आवाहन विभागीय अध्यक्ष राजेंद्र अहिरे यांनी केले आहे.










