सोमवार, ; सोलापूर महापालिका पंचवार्षिक निवडणूक रिंगणात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाकडून महाविकास आघाडी मार्फत एकूण ७ प्रभा प्रभागांमध्ये अर्ज दाखल केले आहेत. महाविकास आघाडीमध्ये माका पक्षाला सात जागा देऊ केल्या होत्या. त्यानुसार पूर्व भागातील प्रभाग ९,१३,१६,१८ येथे उमेदवार देण्यात आले. नामनिर्देशन अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिवशी उमेदवारांनी आपले अर्ज सादर करून ए बी फार्म सुपूर्द केले.
प्रभाग निहाय उमेदवारांची नावे
गीता अनिल वासम – प्रभाग ९(ब)
अरुणा नरसय्या आडम – प्रभाग ९ (क)
सुषमा संतोष सरवदे – प्रभाग १३ (अ)
अनिता प्रवीण आडम – प्रभाग १३ (ब)
श्रीनिवास कुरमय्या म्हेत्रे – प्रभाग १३ (क)
सारा डेव्हिड मंचले – प्रभाग १६ (ब)
नलिनी छगन कलबुर्गी – प्रभाग १८ (ब).










