सोलापूर : गुरुनानक चौकातील जिल्हा रुग्णालयात मोतीबिंदू, तिरळेपणा तसेच इतर नेत्रविकारांची तपासणी करून रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया शिबिर सुरू आहे. दोन दिवसांत एकूण २७० रुग्णांची तपासणी करण्यात आली. यातील ४५ जणांची शस्त्रक्रिया शनिवारी झाली.

राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रम व राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत पुणे नेत्रसेवा प्रतिष्ठान, पुणे तसेच रोटरी ई-क्लब ऑफ सोलापूर इलाइट व रोटरी क्लब ऑफ जुळे सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने शिबिर आयोजित केले. शुक्रवार दि. २७ व २८ फेब्रुवारी रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत आयोजित या शिबिरामध्ये दोन दिवसांत एकूण २७० जणांची नेत्र तपासणी करण्यात आली. यात तिरळेपणाची १८५ जणांची तपासणी करण्यात आली.











