Sunday, February 1, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

अखेर क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिला राजीनामा..!

राजेश भोई by राजेश भोई
December 17, 2025
in महाराष्ट्र, राजकारण
0
अखेर क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिला राजीनामा..!
0
SHARES
66
VIEWS

मुंबई: क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडे असलेली खाती काढून घेण्यात आलेली आहेत. नाशिक सत्र न्यायालयानं कोकाटे यांच्या अटकेचं फर्मान काढलं होतं. कनिष्ठ न्यायालयानं त्यांना सुनावलेली २ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा कायम ठेवली आहे. कोकाटे यांना कधीही अटक होईल अशी शक्यता असताना त्यांच्याकडे असलेली सगळी खाती आता उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे देण्यात आलेली आहेत. अटकेला स्थगिती देण्यासाठी कोकाटे यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

पण तातडीची सुनावणी घेण्यास न्यायालयानं नकार दिला. त्यानंतर अखेर कोकाटे यांच्याकडे असलेला मंत्रिपदाचा भार काढून घेण्यात आला आहे. त्यामुळे आता कोकाटे बिनखात्याचे मंत्री असतील. उच्च न्यायालयानं त्यांना दिलासा न दिल्यास त्यांच्याकडे असलेलं मंत्रिपद काढून घेण्यात येईल. नाशिक सत्र न्यायालयानं कोकाटे यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केलेलं असताना उपमुख्यमंत्री अजित पवार आज सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला गेले.

या बैठकीत कोकाटे यांच्याबद्दल चर्चा झाली. कोकाटे यांना दिलासा देण्यास मुंबई उच्च न्यायालयानं नकार दिल्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्यपालांकडे महत्त्वाची शिफारस केली. कोकाटे यांच्याकडे असलेला मंत्रि‍पदाचा कार्यभार काढण्याची विनंती फडणवीसांकडून करण्यात आली. ती राज्यपालांनी मान्य केली. कोकाटे यांच्याकडे असलेला क्रीडा आणि युवक कल्याण खात्यांचा कार्यभार काढून घेण्यात आलेला आहे. या खात्यांची जबाबदारी आता उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे देण्यात आलेली आहे.

कोकाटें विरोधात अटक वॉरंट जारी, ‘ते’ प्रकरण नेमकं काय?

१९९५ मध्ये मुख्यमंत्री कोट्यातली १० टक्के राखीव सदनिकांचं वाटप कमी दरात करण्यासाठी बोगस कागदपत्रं तयार करुन फसवणूक केल्याचा आरोप कोकाटेंवर आहे. कोकाटे बंधू (माणिकराव आणि त्यांचे बंधू) यांनी अल्प उत्पन्न गटात येत असल्याचं आणि शहरात घर नसल्याचं दाखवण्यात आलं. या बोगस कागदपत्रांच्या आधारे नाशिकच्या उच्चभ्रू बागात दोन सदनिका मिळवल्या. या प्रकरणी माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांच्या तक्रारीवरुन १९९७ मध्ये सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला. या प्रकरणात एकूण चार आरोपी आहे. माणिकराव कोकाटे, त्यांचे बंधू आणि अन्य दोघांचा यात समावेश आहे.

Tags: अजित पवारउद्धव ठाकरेदेवेंद्र फडणवीसमाणिकराव कोकाटेमुंबई मंत्रालयराजीनामासुषमा अंधारे
Previous Post

मोहोळ च्या विकासासाठी निधी ची कमतरता भासू देणार नाही : देवेंद्र फडणवीस

Next Post

काँग्रेसला हात दाखवत दिलीप माने यांनी केला ; भाजपमध्ये प्रवेश..!

Related Posts

सोलापूर महानगरपालिका भाजपाच्या गटनेतेपदी नरेंद्र काळे यांची निवड..!
राजकारण

सोलापूर महानगरपालिका भाजपाच्या गटनेतेपदी नरेंद्र काळे यांची निवड..!

January 31, 2026
सोलापूर जिल्हा परिषदेच्या वतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांना वाहिली आदरांजली
राजकारण

सोलापूर जिल्हा परिषदेच्या वतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांना वाहिली आदरांजली

January 30, 2026
दादा, कुठं हरवलात तुम्ही? घट्ट मिठी मारायचीय; रोहित पवारांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
महाराष्ट्र

दादा, कुठं हरवलात तुम्ही? घट्ट मिठी मारायचीय; रोहित पवारांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट

January 30, 2026
महाराष्ट्र पोरका! अजितदादांवर बारामतीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार..
महाराष्ट्र

महाराष्ट्र पोरका! अजितदादांवर बारामतीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार..

January 29, 2026
महाराष्ट्र राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर..
महाराष्ट्र

महाराष्ट्र राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर..

January 28, 2026
राजकारणातला चाणक्य हरपला : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मृत्यू..!
महाराष्ट्र

राजकारणातला चाणक्य हरपला : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मृत्यू..!

January 28, 2026
Next Post
काँग्रेसला हात दाखवत दिलीप माने यांनी केला ; भाजपमध्ये प्रवेश..!

काँग्रेसला हात दाखवत दिलीप माने यांनी केला ; भाजपमध्ये प्रवेश..!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रोजगार निर्मितीला गती देणारा अर्थसंकल्प : उद्योजक यतिन शहा..!

रोजगार निर्मितीला गती देणारा अर्थसंकल्प : उद्योजक यतिन शहा..!

February 1, 2026
सोलापूर महानगरपालिका भाजपाच्या गटनेतेपदी नरेंद्र काळे यांची निवड..!

सोलापूर महानगरपालिका भाजपाच्या गटनेतेपदी नरेंद्र काळे यांची निवड..!

January 31, 2026
जप्त केलेले ‘मॉडिफाय सायलेंसर’ नष्ट; वाहनधारकांना सायलेंसर नेण्यासाठी १० दिवसांची मुदत..

जप्त केलेले ‘मॉडिफाय सायलेंसर’ नष्ट; वाहनधारकांना सायलेंसर नेण्यासाठी १० दिवसांची मुदत..

January 31, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025