‘ACS हॉस्पिटल’ आणि ‘मराठी पत्रकार संघा’चा उपक्रम
सोलापूर: दैनंदिन धावपळीच्या जीवनात पत्रकारांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, सोलापूर आणि ACS हॉस्पिटल, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत हृदयरोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबीर सोलापूर जिल्ह्यातील सर्व पत्रकार बांधव, त्यांचे कुटुंबीय आणि पत्रकारितेशी संबंधित व्यक्तींसाठी आयोजित करण्यात आले आहे. हे शिबीर गुरुवार, १९ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजता सुरु होणार आहे अशी माहिती महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघचे जिल्हाध्यक्ष अभिषेक आदेप्पा यांनी दिली आहे .हे शिबीर भैय्या चौक येथील ACS हॉस्पिटल येथे होणार आहे

या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी सोलापूरचे महापौर. विनायक कोंड्याल, पोलीस उपायुक्त मा. अश्विनी पाटील, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष. मनीष केत आणि सोलापूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष. विक्रम खेलबुडे उपस्थित राहणार आहेत. तसेच ज्येष्ठ संपादक राकेश टोळ्ये, व्यंकटेश पटवारी, प्रशांत माने आणि संजय पाठक यांचीही प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
तसे या शिबिरात नामांकित हृदयरोग तज्ज्ञांकडून तपासणी केली जाईल, यामध्ये: डॉ. सिद्धांत गांधी डॉ. दिपक गायकवाड डॉ. प्रमोद पवार डॉ. राहुल कारीमुंगी हे असणार आहे . मोफत केल्या जाणाऱ्या चाचण्या: तसेच रुग्णांच्या आवश्यकतेनुसार BP, Sugar, ECG, 2D ECO, Stress Test आणि Stress Eco याही चाचण्या मोफत केल्या जाणार आहेत.










