डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिक्षणप्रेरणेचा गौरव
सोलापूर : शिक्षणाच्या मार्गाने समाज परिवर्तनाचे ध्येय उभे करणारे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शालेय शिक्षणप्रवेश दिनानिमित्त विद्यार्थी दिवस सोलापूर येथील छत्रपती शिवाजी महाराज सर्वोच्च रुग्णालयात उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने रुग्णालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व हारार्पण करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली.
कार्यक्रमाला अधिष्ठाता डॉ. ऋत्विक जयकर, भांडारपाल प्रमुख भीमाशंकर लगदीवे, तसेच महात्मा फुले ज्योतिबा आरोग्य योजनेच्या प्रमुख शशिकला जगताप आणि त्यांच्या सहकाऱ्यांची उपस्थिती होती. यावेळी उपस्थितांनी बाबासाहेबांच्या शिक्षणप्रेरणादायी विचारांचे स्मरण करून, समाजातील प्रत्येक विद्यार्थ्याने ज्ञानार्जनातून प्रगती साधावी, असे संदेश दिले.







