सोलापूर ; संगमेश्वर एज्युकेशन सोसायटीच्या संगमेश्वर रात्र महाविद्यालयात सेक्युअर हॉस्पिटल व संगमेश्वर महाविद्यालय (स्वायत्त) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या मोफत आरोग्य तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.या आरोग्य शिबिराचे उद्घाटन सेक्युअर हॉस्पिटलचे अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. प्रवीण स्वामी व प्राचार्य डॉ. श्रीनिवास गोठे यांच्या हस्ते झाले. यावेळी तज्ज्ञ डॉक्टरांनी विद्यार्थ्यांना आरोग्यदायी जीवनशैली, संतुलित आहार, नियमित व्यायाम व मानसिक आरोग्याचे महत्त्व विशद केले. तसेच वेळोवेळी तज्ज्ञांचा वैद्यकीय सल्ला व उपचार घेण्याचे आवाहनकेले.

प्रास्ताविक प्रा. डॉ. अण्णाराव साखरे यांनी तर सूत्रसंचालन विद्यार्थी प्रतिनिधी गायकवाड यांनी केले. आभार डॉ. सोनाली गिरी यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समन्वयिका प्रा. रेणुका बिराजदार, प्रा. डॉ. रेवप्पा कोळी, प्रा. शिवशरण वांगी, प्रा. चिकटे, प्रा. सौरभ कुलकर्णी, प्रा. प्रतीक्षा बसाटे यांनी परिश्रम घेतले.










