सोलापूर : छत्रपती शिवाजी नाईट कॉलेज येथ े झालेल्या शालेय शहर वेटलिफ्टिंग स्पर्धे त आयडियल इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थिनींनी उल्लेखनीय कामगिरी केली. त्यांना क्रीडा शिक्षक रवींद्र चव्हाण व रविराज माने यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सचिन चव्हाण, सचिवा ज्योती चव्हाण व मुख्याध्यापिका उर्मिला कटाप यांनी अभिनंदन केले.
कामगिरी : १९ वर्षाखालील
प्रतीक्षा किरण गायकवाड (७७ किलो, द्वितीय), अनुष्का प्रशांत हावरे (६९ किलो, तृतीय), श्रावणी अतिश गायकवाड (५८ किलो, तृतीय), प्रांजली प्रकाश येळ े (५३ किलो, तृतीय), वसिफा समीर हंजगीकर (६३ किलो, तृतीय), भूमी सुजय कुलकर्णी (८६ किलो, द्वितीय)








