सोलापूर : आदिवासी कोळी समाजाला १९५० पुर्वीच्या कोळी नोंदीवरून अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र मिळावे. तसेच जात वैधता प्रमाणपत्र सुलभ पद्धतीने मिळावे या मागणीसाठी आज दि.२३ फेब्रुवारी पासून मुंबई येथील आझाद मैदानावर अन्यायग्रस्त आदिवासी कोळी महादेव, डोंगर कोळी, कोळी मल्हार व टोकरे कोळी समाज बांधव आंदोलन करणार आहेत.
समाजाचे नेते दत्ता सुरवसे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होणार आहे. या आंदोलनात सहभागी होण्यासाठी जिल्ह्यातून अनेक आदिवासी कोळी बांधव आझाद मैदानावर जाणार आहेत. सोलापूर शहर जिल्ह्यातून अनेक कार्यकर्ते रविवारी मुंबईच्या दिशेने निघाले आहेत.










