Saturday, December 6, 2025
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

महात्मा फुले जन आरोग्य योजना : सर्वसामान्यांसाठी मोफत व गुणवत्तापूर्ण उपचारांची हमी

राजेश भोई by राजेश भोई
December 5, 2025
in Uncategorized
0
महात्मा फुले जन आरोग्य योजना : सर्वसामान्यांसाठी मोफत व गुणवत्तापूर्ण उपचारांची हमी
0
SHARES
2
VIEWS

*या योजनेतून हृदयविकार, किडनीचे आजार, कॅन्सरवरील शस्त्रक्रिया व रेडिओलॉजी तसेच हाडांवरील सर्व शस्त्रक्रिया मोफत करण्यात येतात

सोलापूर :- महाराष्ट्र शासनाच्या महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत गरजू रुग्णांना मोफत वैद्यकीय उपचार व शस्त्रक्रियांचा लाभ मिळत आहे. या योजनेत प्रति कुटुंब प्रति वर्ष रु. 5 लक्ष पर्यंतचे विमा संरक्षण उपलब्ध असून एकूण 1356 प्रकारच्या उपचारांचा समावेश आहे. मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी स्वतंत्रपणे रु. 4.5 लक्ष पर्यंतचे संरक्षण दिले जाते. तसेच रस्ते अपघातग्रस्तांना प्रति व्यक्ती, प्रति अपघात रु. 1 लक्ष पर्यंतचा लाभ मिळतो, अशी माहिती या योजनेचे जिल्हा समन्वयक प्रवीण गुंजाळ यांनी दिली आहे.

महाराष्ट्र शासनाच्या महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेंतर्गत राज्यातील शिधापत्रिका धारक, अधिवास प्रमाणपत्रधारक, बांधकाम कामगार, पत्रकार, अपंग, अनाथ आश्रम व वृद्धाश्रमातील रहिवासी, तसेच महिला व बालविकास विभागाच्या वसतिगृहातील लाभार्थ्यांना मोफत व गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा उपलब्ध करून दिली जात आहे.

या योजने अंतर्गत कॅन्सर, हृदयविकार, यकृत व मूत्रपिंड विकार, मेंदू व मज्जासंस्था, नवजात बालकांचे आजार, अपघातातील शस्त्रक्रिया, हाडांचे विकार, स्त्रीरोग, नेत्ररोग, कान-नाक-घसा विकार, फुफ्फुस व पचनसंस्थेचे आजार, मानसिक आजार हृदयविकारासंबंधीत शस्त्रक्रिया एन्जोप्लास्टी बायपास सर्जरी व किडनी संदर्भातील मुतखडे प्रोस्टेट ग्रंथीचे आजार व डायलिसिस अशा एकूण १३५६ उपचारांचा लाभ घेता येतो. योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड, शिधापत्रिका, अधिवास दाखला, ओळखपत्र, शाळा दाखला किंवा पत्रकारिता आयोगाचा दाखला आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी www.jeevandayee.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी किंवा १५५३८९ / १८००२३३२२०० या नि:शुल्क क्रमांकावर संपर्क साधावा, असे आव्हान श्री. गुंजाळ यांनी केले.

Previous Post

विठ्ठल ढेपे यांची वेतन व भविष्य निर्वाह पथकाच्या निधी अधीक्षकपदी नियुक्ती

Related Posts

जिल्ह्यातील नगरपालिकेच्या निवडणुकांची या ठिकाणी होणार मतमोजणी
Uncategorized

जिल्ह्यातील नगरपालिकेच्या निवडणुकांची या ठिकाणी होणार मतमोजणी

November 29, 2025
संसर्गजन्य आजारांचा धोका टाळण्यासाठी दररोज बदलणार रुग्णांचे बेडशीट
Uncategorized

संसर्गजन्य आजारांचा धोका टाळण्यासाठी दररोज बदलणार रुग्णांचे बेडशीट

November 18, 2025
नगरपंचायत निवडणुकीचा संघर्ष चिघळला, उज्वला थिटे यांनी पोलीस बंदोबस्तात निवडणूक कार्यालय गाठलं
Uncategorized

नगरपंचायत निवडणुकीचा संघर्ष चिघळला, उज्वला थिटे यांनी पोलीस बंदोबस्तात निवडणूक कार्यालय गाठलं

November 17, 2025
खर्डी येथे उद्या होणार सद्‌गुरू सीताराम महाराज पुण्यतिथी सोहळा..
Uncategorized

खर्डी येथे उद्या होणार सद्‌गुरू सीताराम महाराज पुण्यतिथी सोहळा..

November 16, 2025
सोलापूरसह महाराष्ट्रात ओबीसीसाठी सोमवारी होणार आरक्षण
Uncategorized

सोलापूरसह महाराष्ट्रात ओबीसीसाठी सोमवारी होणार आरक्षण

November 15, 2025
छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात ‘विद्यार्थी दिवस’ उत्साहात साजरा
Uncategorized

छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात ‘विद्यार्थी दिवस’ उत्साहात साजरा

November 7, 2025

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025