सोलापूर : पुणे शिक्षक मतदार संघातील आणि मराठवाडा पदवीधर मतदारसंघातील मतदारांची नोंदणी करणे व या दोन्ही विभागातून शिवसेनेचा उमेदवार जास्त मतांनी निवडून आणण्याची जबाबदारी आता देणारे नियुक्तीपत्र शिवसेनेचे राज्य समन्वयक खासदार नरेश मस्के यांनी काढले आहे. यामध्ये पुणे शिक्षक मतदार नोंदणी प्रमुख पदी मंगेश चिवटे यांची तर मराठवाडा पदवीधर मतदार नोंदणी प्रमुख पदी राजेंद्र जंजाळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे.शिवसेनेचे मुख्य नेते तथा संवेदनशील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महाराष्ट्र समनव्यक खासदार नरेशजी म्हस्के यांच्या शुभहस्ते आज हे नियुक्तीपत्र मंगेश चिवटे यांना देण्यात आले. पुणे शिक्षक मतदार संघातून शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख यांनी गेली १ वर्षापासून तयारी सुरू केली असून सोलापूर , सांगली , कोल्हापूर येथे एकनाथ स्वाभिमानी शिक्षक सेनेच्या वतीने शिक्षक मेळावे घेण्यात आले आहेत. एकनाथ स्वाभिमानी शिक्षक सेनेचे अध्यक्ष प्रा.बाळासाहेब आडसूळ यांच्या माध्यमातून गेली १ महिन्यापासून शिवसेनेचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी शिक्षक मतदार नोंदणीची प्रक्रिया राबवत आहेत.नुकतेच सामाजिक न्याय मंत्री श्री.संजयजी शिरसाठ यांनी मंगेश चिवटे यांच्या उमेदवारीसाठी आम्ही आग्रही मागणी करू असे विधान केले होते. उद्योग मंत्री उदयजी सामंत, सांगोल्याचे माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी देखील यापूर्वी आपल्या जाहीर भाषणातून मंगेश चिवटे शिवसेनेकडून पुणे शिक्षक मतदार संघातून योग्य उमेदवार आहेत त्यामुळे पुणे पदवीधर मतदारसंघ भाजपने घ्यावा आणि पुणे शिक्षक मतदारसंघ शिवसेनेला सोडावा असे आवाहन केले होते.

मंगेश चिवटे यांनी शिक्षकांच्या आरोग्य विषयक जिव्हाळाच्या प्रश्नाला हात घातला आहे. चिवटे यांनी राज्याचे आरोग्यमंत्री श्री प्रकाश अबीटकर यांच्याकडे पाठपुरावा करून नुकतीच मंत्रालयात बैठक घेऊन राज्यातील सर्व शिक्षकांना धर्मवीर आनंद दिघे शिक्षक कुटुंब कॅशलेस विमा योजना लागू करावी म्हणून पुढाकार घेतला आहे. यासंदर्भात आरोग्यमंत्री श्री अबीटकर यांनी समिती स्थापन करण्याची घोषणा केली आहे.
शिक्षकांच्या आरोग्याचा प्रश्न व उपचाराची बिले काढण्यासाठी शिक्षकांना प्रचंड मानसिक त्रास होतो. यामुळे या निवडणुकीपूर्वी राज्यातील सर्व शिक्षकांना कॅशलेस विमा योजना लागू करणार असे सांगत मंगेश चिवटे पुणे शिक्षक विभागातून आपला उमेदवारीचा प्रचार करत असल्याचे दिसून येत आहे. टप्पा वाढ संदर्भात आझाद मैदान येथे नुकत्याच झालेल्या आंदोलनात सरकार आणि आंदोलक आणि शिक्षक संघटना यांच्यामध्ये मंगेश चिवटे यांनी यशस्वी मध्यस्थीची भूमिका पार पाडून शिक्षकांना टप्पा अनुदान मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडली होती.

संवेदनशील उपमुख्यमंत्री श्री.एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखालीआरोग्य क्षेत्रात काम करत असताना मुख्यमंत्री वैद्यक सहाय्यता कक्षातून अडीच वर्षात 450 कोटी रुपये वितरित करून मंगेश चिवटे यांनी आरोग्य क्षेत्रातील विक्रम केलेला आहे. यामुळे सुमारे 50 हजार पेक्षा जास्त रुग्णांचे प्राण वाचण्यास मदत झाली आहे.मंगेश चिवटे यांनी शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून गेल्या 8 वर्षात जन्मतः हृदयाला छिद्र असलेल्या जवळपास 10 हजार पेक्षा अधिक बालकांच्या शस्त्रक्रिया मोफत करून देण्यासाठी अथक मेहनत घेतली आहे.
पुणे शिक्षक मतदारसंघावर शिवसेनेचा दावा
शिवसेना मुख्य नेते .एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार शिवसेना महाराष्ट्र राज्य समन्वयक नरेश म्हस्के यांनी मंगेश चिवटे यांची पुणे शिक्षक मतदार संघाच्या नोंदणी प्रमुख पदी निवड करून एक प्रकारे शिक्षक मतदार संघावर शिवसेनेने दावा दाखवला आहे.








