मुंबई ; राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाबद्दल मंत्रालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या वतीने आज मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात विशेष शोक सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित सर्वांनी दिवंगत नेत्याच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करून श्रद्धांजली वाहिली.
याप्रसंगी प्रशासनाच्या वतीने भावना व्यक्त करताना अपर मुख्य सचिव विकास खारगे म्हणाले की, “उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या प्रदीर्घ सेवाकाळात नेहमीच प्रामाणिकपणे, निष्ठेने आणि उच्च कर्तव्यभावनेने कार्य केले. त्यांच्या निधनाने राज्य शासनाने एक अत्यंत कर्तव्यदक्ष, शिस्तबद्ध आणि वेळेचे तंतोतंत पालन करणारे (वक्तशीर) नेतृत्व गमावले आहे. प्रशासनावर त्यांची असलेली पकड आणि कामाचा उरक नेहमीच मार्गदर्शक ठरेल.” शोकसभेच्या प्रारंभी दिवंगत अजित पवार यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.


यावेळी मंत्रालयातील अनेक वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते, ज्यात प्रामुख्याने: डॉ. इकबालसिंह चहल, मनीषा म्हैसकर, अश्विनी भिडे. असिम कुमार गुप्ता, विकासचंद्र रस्तोगी, वेणुगोपाल रेड्डी. अनुपकुमार सिंग, राधिका रस्तोगी, एकनाथ डवले, सौरभ विजय. डॉ. हर्षदीप कांबळे, अतुल पाटणे, संजय खंदारे, एस. चोक्कलिंगम. रणजितसिंह देओल, वीरेंद्र सिंह, गणेश पाटील व इतर मान्यवरांचा वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती समावेश होता.
या शोकसभेत मंत्रालयातील विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कुटुंबीयांप्रती सहवेदना व्यक्त करण्यात आली. हे अपार दुःख सहन करण्याचे बळ त्यांच्या परिवाराला लाभो, अशी प्रार्थनाही यावेळी करण्यात आली.












