सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्याचे आमदार सुभाष देशमुख यांनी नागपूर येथे केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीनजी गडकरी यांची सदिच्छा भेट घेतली.

या भेटीत सोलापूर जिल्ह्यातील विविध विकासकामांबाबत, तसेच मतदारसंघातील पायाभूत सुविधांबाबत सविस्तर चर्चा झाली. विशेषतः अलीकडील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची परिस्थिती त्यांच्यासमोर मांडली. रस्ते, पूल, नाल्यांमध्ये झालेल्या हानीसंदर्भात तातडीने उपाययोजना होण्यासाठी सहकार्याची विनंती केली.गडकरी यांना सकारात्मक प्रतिसाद देत योग्य ती पावले उचलू आश्वासन दिले.
#NitinGadkari #Nagpur #Solapur #Development #Infrastructure #FloodRelief #PublicService








