सोलापूर ; अतिवृष्टीमुळे सीना नदीला आलेल्या पुर आला असून यामुळे दक्षिण सोलापूर तालुकायतील वांगी आणि वडकबाळ , पाथरी आणि तेलगाव (सिना) , तिऱ्हे पाकणी व शिवणी, अनेक गावातील अनेक घरांमध्ये पाणी शिरले आहे. या पुराच्या पाण्याने गावातील काही घरे पूर्णपणे उध्वस्त झाली आहेत. तर अनेक नागरिकांच्या व्यवसायावरही मोठं संकट ओढवलं आहे.
आज शासकीय अधिकाऱ्यांसह गाव भेट देऊन पूरग्रस्त नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी कोणतेही कुटुंब शासनाच्या मदतीपासून वंचित राहू नये, यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या.

या अडचणीच्या काळात नागरिकांच्या पाठीशी भक्कमपणे उभा असल्याचा विश्वास यावेळी नागरिकांना दिला. तसेच यापुढेही कोणतीही अडचण अथवा समस्या असल्यास थेट कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन आमदार सुभाष देशमुख यांनी केले आहे, या वेळी तहसीलदार, गटविकास अधिकारी तसेच तालुक्यातील प्रमुख अधिकारी उपस्थित होते.








