Tuesday, March 31, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

बिहार निवडणुकीत महिलांना 10 हजार वाटल्याने NDA चा विजय; शरद पवार यांचा दावा

राजेश भोई by राजेश भोई
November 15, 2025
in महाराष्ट्र, राजकारण
0
बिहार निवडणुकीत महिलांना 10 हजार वाटल्याने NDA चा विजय; शरद पवार यांचा दावा
0
SHARES
2
VIEWS

मुंबई : केंद्र सरकारने बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी महिलांना प्रत्येकी 10 हजार रुपये वाटले. या पैशांमुळेच तिथे भाजप प्रणित एनडीएचा विजय झाला, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी केला. सरकारने निवडणुकीपूर्वी अधिकृतपणे पैसे वाटल्यामुळे बिहारमध्ये याहून वेगळा निकाल लागण्याची अपेक्षा नव्हती, असेही ते यावेळी म्हणाले.

बिहार विधानसभा निवडणुकीत भाजप – जदयु आघाडीचा दैदिप्यमान विजय झाला. यामुळे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या नेतृत्वात तिथे एनडीएचे सलग 5 व्यांदा सरकार येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. विरोधकांनी या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात मतांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप केला आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी वरील दावा केला आहे. ते शनिवारी बारामतीत पत्रकारांशी बोलताना म्हणाले, बिहार निवडणुकीपूर्वी सरकारने तिथे मोठ्या प्रमाणात पैसै वाटले. त्यामुळे तिथे वेगळा निकाल लागण्याची शक्यता शक्यता नव्हती.

सरकारने मतांसाठी अधिकृतपणे पैसे वाटले
शरद पवार म्हणाले, बिहार विधानसभेचे मतदान झाल्यानंतर मी काही लोकांशी संवाद साधला. त्यांच्याकडून मला असा फिडबॅक मिळाला की, ही निवडणूक महिलांनी हातात घेतली होती. सरकारने महिलांच्या खात्यात प्रत्येकी 10 हजार रुपये टाकले. त्यामुळे महिलांनी निवडणुकीत मोठ्या प्रमाणात मतदान केले. बिहारमधील एनडीएचा विजय हा त्याचा परिणाम असावा. महाराष्ट्रातही निवडणुकीच्या अगोदर अधिकृतपणे पैसे वाटण्यात आले. हा प्रकार एखादा व्यक्ती मतांसाठी पैसे वाटतो तसा नव्हता, तर सरकारने स्वतः लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून अधिकृतपणे मतांसाठी पैसे वाटले होते.

तसाच प्रकार बिहारमध्ये घडला. आत्ता प्रश्न असा आहे की, येथून पुढील निवडणुकांत ज्यांच्या हातात सत्ता आहे, त्यांनी मतदानाच्या आधी अशा पद्धतीने पैशांचे वाटप करून निवडणुकीला सामोरे जाण्याची भूमिका घेतली, तर एकंदर निवडणुकीच्या पद्धतीविषयी लोकांच्या मनात असलेल्या विश्वासालाच धक्का बसेल. एवढ्या मोठ्या प्रमाणात पैशांचे वाटप करणे योग्य आहे का? याचा विचार जाणकारांनी केला पाहिजे. निवडणूक आयोगानेही याचा विचार केला पाहिजे.

Previous Post

सोलापूरसह महाराष्ट्रात ओबीसीसाठी सोमवारी होणार आरक्षण

Next Post

महाविकास आघाडीत फूट? मुंबई महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढवण्याची काँग्रेसची घोषणा

Related Posts

भरणेवाडी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी  बजावला मतदानाचा हक्क..
राजकारण

भरणेवाडी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी बजावला मतदानाचा हक्क..

February 7, 2026
या ठिकाणी होणार जिल्हा परिषद पंचायत समितीची मतमोजणी…!
राजकारण

या ठिकाणी होणार जिल्हा परिषद पंचायत समितीची मतमोजणी…!

February 7, 2026
उद्या होणाऱ्या महापौर निवडीसाठी भाजपचे नगरसेवकांनी वेळेत उपस्थित राहावे
राजकारण

उद्या होणाऱ्या महापौर निवडीसाठी भाजपचे नगरसेवकांनी वेळेत उपस्थित राहावे

February 5, 2026
इथे कोणाचीही दादागिरी खपवून घेतली जाणार नाही. आम्ही शिवसैनिक आहोत..
राजकारण

इथे कोणाचीही दादागिरी खपवून घेतली जाणार नाही. आम्ही शिवसैनिक आहोत..

February 5, 2026
सोलापूर महानगरपालिका भाजपाच्या गटनेतेपदी नरेंद्र काळे यांची निवड..!
राजकारण

सोलापूर महानगरपालिका भाजपाच्या गटनेतेपदी नरेंद्र काळे यांची निवड..!

January 31, 2026
सोलापूर जिल्हा परिषदेच्या वतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांना वाहिली आदरांजली
राजकारण

सोलापूर जिल्हा परिषदेच्या वतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांना वाहिली आदरांजली

January 30, 2026
Next Post
महाविकास आघाडीत फूट? मुंबई महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढवण्याची काँग्रेसची घोषणा

महाविकास आघाडीत फूट? मुंबई महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढवण्याची काँग्रेसची घोषणा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

२२ एप्रिल रोजी झेडपीची पहिली सर्वसाधारण सभा

२२ एप्रिल रोजी झेडपीची पहिली सर्वसाधारण सभा

March 30, 2026
“पुरुषांना अनेक पर्याय, मग महिलांनी काय करायचे?” – स्वीकृत नगरसेवक मनीष केत यांचा महापालिकेत सवाल.

“पुरुषांना अनेक पर्याय, मग महिलांनी काय करायचे?” – स्वीकृत नगरसेवक मनीष केत यांचा महापालिकेत सवाल.

March 30, 2026
कोल्हापूरची अमृता पुजारी डबल महाराष्ट्र केसरी

कोल्हापूरची अमृता पुजारी डबल महाराष्ट्र केसरी

March 30, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025