सोलापूर : शहरात उल्लेखनीय कामगिरीबद्दल सोलापूर शहराचे पोलीस आयुक्त एम. राज कुमार यांनी पोलीस निरीक्षक अरविंद माने आणि त्यांच्या पथकाचे विशेष कौतुक केले आहे. त्यांना ‘प्रशस्तीपत्र’ देऊन सन्मानित करण्यात आले. “महाराष्ट्र पोलीस दलाला आपल्या सेवेचा अभिमान वाटतो. भविष्यातही आपण अशाच प्रकारे उत्कृष्ट कर्तव्य बजावून पोलीस दलाच्या उज्ज्वल परंपरेत भर घालाल, अशी खात्री आहे,” अशा शब्दांत आयुक्तांनी त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली आहे.

आतापर्यंत केलेल्या कामाची पोच पावती : पोलीस निरीक्षक अरविंद माने शहरात कडक बंदोबस्त शहरातील वाढती गुन्हेगारी पाहता पोलिसांनी अवैध शस्त्रांविरुद्ध मोहीम तीव्र केली आहे. या कारवाईमुळे अवैध शस्त्र विक्रेते आणि ते बाळगणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. या प्रकरणाचा अधिक तपास सोलापूर पोलीस करत असून, ही शस्त्रे कोठून आणली आणि याचा वापर कोठे केला जाणार होता, याचा शोध घेतला जात आहे.
मुद्देमाल जप्त आणि गुन्हा दाखल : पोलिसांनी या कारवाईत शस्त्रे आणि गुन्ह्यात वापरलेली मोटार सायकल असा एकूण २,१६,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २७/२०२६ नुसार ‘भारतीय हत्यार कायदा’ (Arms Act) कलम ३/२५ आणि ‘महाराष्ट्र पोलीस कायदा’ (MP Act) कलम १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.











