मुंबई : एकनाथ शिंदेंनी आत्मचिंतन करावे आणि आज मी या पदावर कुणामुळं आहे, यापूर्वी मी काय होतो याचा विचार करायला हवा. उद्धव ठाकरेंमध्ये दानत होती म्हणून रिक्षावाले आमदार आणि मंत्री झाले. त्यामुळे कधीही प्रॅक्टिस न केलेला मुलगा खासदार झाला. हार्ड वैद्यांचे प्रमाणपत्र बघा मोदीही मागे पडतील, हे सर्व उद्धव ठाकरेंच्या दानतीमुळे शक्य झाले,असे उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. शिंदे गटाचे लोक अमित शहा यांच्या पादुकाचे पूजन करतात म्हणून त्यांच्या मेंदूवर परिणाम झाला आहे.
उबाठाचे नेते संजय राऊत म्हणाले की, एकनाथ शिंदे, रामदास कदम यांना काही बाळासाहेब ठाकरेंनी नेता केले नाही. त्यांना उद्धव ठाकरेंनी हे पद दिले होते. उद्धव ठाकरेंनी या सर्वांना मोठ्या मनाने पदे दिली. मंत्रिपदे दिली आणि हे आता उद्धव ठाकरेंवर टीका करत आहेत. तुमच्या सारखा एक रिक्षावाला आज 5 लाख कोटी रुपयांचा मालक झाला, एका वेळेला 100 कोटी निवडणुकीवर उधळतात हे सर्व उद्धव ठाकरेंमुळेच झाले, याचे आत्मचिंतन शिंदेंनी केले पाहिजे. बाळासाहेब ठाकरे यांनी मला नेते पद दिले मला राजकारण काय हे सगळे माहिती आहे, असा टोला संजय राऊत यांनी रामदास कदम यांना लगावला आहे.
जनतेचे ठाकरेंवर प्रेम
संजय राऊत म्हणाले की, शिवतीर्थावरील कालचा दसरा मेळावा हा अनेक दृष्टीने महत्त्वाचा होता. जोरदार पाऊस सुरू असताना मेळाव्यासाठी हजारो शिवसैनिक उपस्थित होते. हे चित्र आहे की मुंबई मनपा आणि इतर मनपासाठी लोक किती तयारीने आहेत त्यांचे. इतका पाऊस असताना लोक हटले नाही, उद्धव ठाकरेंनी पावसामुळे भाषण थांबवण्याचा विचार केला तर शिवसैनिकांनी त्यांना तुम्ही बोला पावसामुळे भाषण थांबवू नका असे सांगितले हे प्रेम केवळ ठाकरेंच्या वाट्यालाच येऊ शकते. बाळासाहेब ठाकरेंबद्दल रामदास कदम यांनी केलेले वक्तव्य हे अत्यंत चुकीचे आहे. असे वक्तव्य करणे बेइमानी आहे.







