सोलापूर, – सोलापूर ग्रामीण जिल्हयाच्या हद्दीत शांतता, कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी, तसेच समाजकंटक व गुंडप्रवृत्ती इसमांवर प्रतिबंधक कारवाई करणे सोईचे जावे यासाठी दिनांक- 25 ऑक्टोबर 2025 रोजीचे 20.00 वाजलेपासून ते दिनांक- 09 नोव्हेंबर 2025 रोजीच्या 20.00 वा. पर्यंत महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 37 (3) चे आदेश लागू करण्यात येत असल्याची माहिती अपर जिल्हादंडाधिकारी अभिजित पाटील यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये दिली.

या आदेशानुसार पाच किंवा पाचहून जास्त लोक एकत्र येण्यास बंदी घालत आली आहे. हा हुकुम अत्यावश्यक सेवा, सरकारी कामकाज बजावणाऱ्या यंत्रणांना लागू होणार नाही. तसेच ज्या प्रकरणी जिल्हादंडाधिकारी, पोलीस अधिक्षक (ग्रामीण), उपविभागीय दंडाधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरिक्षक, दुय्यम पोलीस निरीक्षक यांनी पूर्व परवानगी दिली आहे. अशा यात्रा स्थळे व तत्सम प्रकरणांपुरते लागू होणार नाही, असे पत्रकात नमूद आहे.







