७ मार्चपासून विविध गावांत मिळणार शासकीय योजनांचा लाभ
सोलापूर; राज्य सरकारचा कारभार लोकाभिमुख करण्यासाठी आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आदेशानुसार उत्तर सोलापूर तहसील कार्यालयाच्या वतीने तालुक्यात विविध ठिकाणी ‘समाधान शिबिरांचे’ आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरांच्या माध्यमातून नागरिकांना एकाच छताखाली सेतूचे दाखले मिळण्यापासून ते शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ घेता येणार आहे. या उपक्रमाची सविस्तर माहिती उत्तर सोलापूरचे तहसीलदार निलेश पाटील यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना दिली.
कृषी व बँकिंग: पात्र शेतकऱ्यांना ३ लाख रुपयांपर्यंतचे बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाईल. तसेच बँका, पोस्ट कार्यालय, सहकार आणि कृषी विभागाच्या योजनांचाही लाभ मिळेल. याशिवाय आरटीओ, मुद्रांक विभाग, महावितरण, महिला व बालविकास, ग्रामपंचायत आणि बांधकाम विभाग देखील या शिबिरात सहभागी होऊन सामूहिक व वैयक्तिक योजनांची माहिती देतील. याशिवाय आरटीओ, मुद्रांक विभाग, महावितरण, महिला व बालविकास, ग्रामपंचायत आणि बांधकाम विभाग देखील या शिबिरात सहभागी होऊन सामूहिक व वैयक्तिक योजनांची माहिती देतील.

- या योजनांचा मिळणार लाभ?
- महसूल विभाग: उत्पन्न, जात आणि इतर आवश्यक दाखल्यांचे वितरण केले जाईल.
- सातबारा उपक्रम: सातबाराचे वाचन करून ‘जिवंत सातबारा’ हा विशेष उपक्रम राबवण्यात येईल.
- पुरवठा विभाग: गरजू कुटुंबांना नवीन रेशनकार्डचे वितरण करण्यात येईल.
- सामाजिक न्याय: संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना तातडीने लाभ मिळवून दिला जाईल.
- आरोग्य तपासणी: आरोग्य विभागामार्फत नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी केली जाईल.
- तहसीलदार निलेश पाटील यांनी जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार विविध ठिकाणी ही शिबिरे
- ७ मार्च तिर्हे, कोंडी
- १४ मार्च वडाळा, मार्डी
- १० एप्रिल बाळे, शेळगी
- १७ एप्रिल सोरेगाव
- ८ मे सोलापूर शहर
- १५ मे मजरेवाडी










