Wednesday, May 20, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

आंतरजिल्हा चोरट्याचा सोलापुरात ‘गेम’; गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या,१५ दुचाकी हस्तगत!

SOLAPUR MIRROR by SOLAPUR MIRROR
March 3, 2026
in क्राईम, सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
आंतरजिल्हा चोरट्याचा सोलापुरात ‘गेम’; गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या,१५ दुचाकी हस्तगत!
0
SHARES
29
VIEWS

सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने आंतरजिल्हा टोळीचा पर्दाफाश ; ४.४५ लाखांच्या १५ मोटार सायकली हस्तगत

सोलापूर ; सोलापूर शहर आणि परिसरात गेल्या काही दिवसांपासून मोटार सायकली चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. या गुन्ह्यांची गंभीर दखल घेत सोलापूर शहर गुन्हे शाखेने धडक कारवाई करत एका सराईत आंतरजिल्हा चोरट्याला जेरबंद केले आहे. त्याच्याकडून तब्बल ४ लाख ४५ हजार रुपये किमतीच्या १५ मोटार सायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत. सोलापूरचे पोलीस आयुक्त . एम. राज कुमार, पोलीस उप-आयुक्त डॉ. अश्विनी पाटील आणि सहाय्यक पोलीस आयुक्त.राजन माने यांनी दिलेल्या आदेशानुसार गुन्हे शाखेचे पथक तपासात होते. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. शैलेश खेडकर आणि त्यांच्या पथकाने सीसीटीव्ही फुटेजचे तांत्रिक विश्लेषण केले.

या दरम्यान, पोलीस अंमलदार इम्रान जमादार आणि संदीप जावळे यांनी संशयित आरोपीची ओळख पटवली. २८ फेब्रुवारी २०२६ रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, विष्णू घाट परिसरातील फूटपाथ जवळ एक इसम विना नंबर प्लेटची काळ्या रंगाची ‘होंडा युनिकॉर्न’ विकण्यासाठी थांबला होता. पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले.

सचिन अंकुश कात्रे (वय ४० वर्षे, रा. बीड, मूळ रा. मसोबाची वाडी, जि. धाराशिव) असे आरोपीचे नाव आहे. सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली, परंतु पोलिसांनी अधिक विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्याने ही मोटार सायकल सोलापूरच्या हुतात्मा स्मृती मंदिर येथून चोरी केल्याची कबुली दिली. अधिक तपासात त्याने गेल्या सहा महिन्यात सोलापूरसह अहिल्यानगर, बीड, जालना, धाराशिव आणि लातूर जिल्ह्यातून आणखी १४ मोटार सायकली चोरी केल्याचे मान्य केले. या धडक कारवाईमुळे अनेक जिल्ह्यांतील दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.

ही कामगिरी पोलीस आयुक्त . एम.राज कुमार, पोलीस उप-आयुक्त डॉ. अश्विनी पाटील आणि स.पो.आ.राजन माने यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने, स.पो.नि. शैलेश खेडकर, अंमलदार संदीप जावळे, विनोद रजपुत, राजकुमार पवार, इम्रान जमादार, उमेश पवार, वसीम शेख व पथकाने केली आहे.

सहा जिल्ह्यांत पसरले होते चोरीचे जाळे

  • सोलापूर शहर: ३ गाड्या
  • अहिल्यानगर: ३ गाड्या (कोतवाली, शेवगाव, जामखेड)
  • बीड: ३ गाड्या (बीड ग्रामीण, चकलांबा, गेवराई)
  • जालना: २ गाड्या
  • धाराशिव (कळंब) व लातूर (औसा): प्रत्येकी १ गाडी
Tags: Crime
Previous Post

ए. जी. पाटील पॉलिटेक्निकमध्ये राष्ट्रीय स्तरावरील तांत्रिक शोधनिबंध स्पर्धां संपन्न…

Next Post

उत्तर तहसील कार्यालयामार्फत ‘समाधान शिबिरांचे’ आयोजन ; तहसीलदार निलेश पाटील

Related Posts

मान्सूनपूर्व तयारीला वेग; सर्व यंत्रणांनी सज्ज राहा ; अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांचे निर्देश
सोलापूर जिल्हा

मान्सूनपूर्व तयारीला वेग; सर्व यंत्रणांनी सज्ज राहा ; अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांचे निर्देश

May 19, 2026
जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग ; १८ जूनला मतदान, २५ जूनपर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण
सोलापूर जिल्हा

जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग ; १८ जूनला मतदान, २५ जूनपर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण

May 19, 2026
पर्यावरणपूरक संदेश देत महापौरसह उपमहापौर  ई-बाईकवरून महापालिकेत दाखल
सोलापूर जिल्हा

पर्यावरणपूरक संदेश देत महापौरसह उपमहापौर ई-बाईकवरून महापालिकेत दाखल

May 18, 2026
मंद्रूप येथील शेततळ्यात बुडून दोन शाळकरी मुलांचा दुर्दैवी मृत्यू
सोलापूर जिल्हा

मंद्रूप येथील शेततळ्यात बुडून दोन शाळकरी मुलांचा दुर्दैवी मृत्यू

May 18, 2026
राजू शेट्टी यांच्या शक्तीपीठ महामार्गाला माढ्यात तीव्र विरोध ; “एक इंचही जमीन देणार नाही”चा निर्धार
सोलापूर जिल्हा

राजू शेट्टी यांच्या शक्तीपीठ महामार्गाला माढ्यात तीव्र विरोध ; “एक इंचही जमीन देणार नाही”चा निर्धार

May 17, 2026
विजापूर रोड हद्दीत घरफोडी करणाऱ्या ‘मंत्री’ला ४८ तासांत केले गजाआड
क्राईम

विजापूर रोड हद्दीत घरफोडी करणाऱ्या ‘मंत्री’ला ४८ तासांत केले गजाआड

May 17, 2026
Next Post
उत्तर तहसील कार्यालयामार्फत ‘समाधान शिबिरांचे’ आयोजन ; तहसीलदार निलेश पाटील

उत्तर तहसील कार्यालयामार्फत 'समाधान शिबिरांचे' आयोजन ; तहसीलदार निलेश पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मान्सूनपूर्व तयारीला वेग; सर्व यंत्रणांनी सज्ज राहा ; अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांचे निर्देश

मान्सूनपूर्व तयारीला वेग; सर्व यंत्रणांनी सज्ज राहा ; अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांचे निर्देश

May 19, 2026
जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग ; १८ जूनला मतदान, २५ जूनपर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण

जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग ; १८ जूनला मतदान, २५ जूनपर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण

May 19, 2026
पर्यावरणपूरक संदेश देत महापौरसह उपमहापौर  ई-बाईकवरून महापालिकेत दाखल

पर्यावरणपूरक संदेश देत महापौरसह उपमहापौर ई-बाईकवरून महापालिकेत दाखल

May 18, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025