सोनाली यादव यांनी अद्याप पदभार स्विकारला नाही
सोलापूर : महानगरपालिका येथे उपायुक्त पदावर मुख्याधिकारी (गट-अ) संवर्गातील सोनाली यादव यांची शासनाच्यावतीने प्रतिनियुक्तीने नियुक्ती करण्यात आली आहे.
नगर विकास विभागाच्यावतीने १८ फेब्रुवारी रोजी ही नियुक्ती केली आहे. महापालिकेतील तत्कालीन उपायुक्त तैमूर मुलाणी यांची ४ नोव्हेंबर २०२५ रोजी बार्शी येथे बदली झाल्यानंतर ते पद रिक्त होते. यादव या यापूर्वी वसई-विरार महानगरपालिका येथे उपायुक्त म्हणून कार्यरत होत्या. त्यांची नियुक्ती सोलापूर महानगरपालिकेतील रिक्त उपायुक्त पदावर प्रारंभी दोन वर्षांच्या कालावधीसाठी करण्यात आली आहे. यादव यांनी अद्याप पदभार स्विकारला नाही.










