सोलापूर | सोमवार, ०२ फेब्रुवारी २०२६सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराज यांच्या जीवनावर आधारित ऐतिहासिक आणि दुर्मिळ हस्तलिखित पुराण चोरीला गेल्याच्या आरोपातून एका आरोपीची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी बिराजदार साहेब यांनी हा निकाल दिला.
श्री सिद्धेश्वर महाराजांचे चरित्र कवी राघवान यांनी सन ११४० मध्ये हस्तलिखित स्वरूपात लिहिले होते. सुमारे ५० पानांचे हे ताम्रपटावरील पुराण एका लाकडी पेटीत फिर्यादीच्या वाड्यातील पूजास्थानी ठेवण्यात आले होते. दररोज पहाटे ५:०० वाजता या पुराणाची पूजा केली जात असे. मात्र, एका पहाटे ही लाकडी पेटी आणि पूजेचे साहित्य चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. मात्र याप्रकरणी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात घरफोडी व चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होते..
या खटल्यामध्ये फिर्यादी पक्षाकडून एकूण ६ साक्षीदार तपासण्यात आले. मात्र, बचावाचे वकील अॅड. अखिल आर. शाक्य यांनी न्यायालयात प्रभावी युक्तिवाद केली. तपासण्यात आलेल्या ६ साक्षीदारांच्या जबाबांमध्ये मोठी विसंगती आहे.दरम्यान आरोपीविरुद्ध गुन्हा सिद्ध होईल असा कोणताही ठोस पुरावा उपलब्ध झालला नाही. न्यायालयाने हा युक्तिवाद ग्राह्य धरून पुराव्याअभावी आरोपीची या गुन्ह्यातून ससन्मान निर्दोष मुक्तता केली.
आरोपीच्या वतीने अॅड. अखिल आर. शाक्य, अॅड. अजिंक्य आर. शाक्य, अॅड. दर्शना दीक्षा चक्रवर्ती आणि अॅड. अश्विनी कांबळे यांनी कायदेशीर कामकाज पाहिले.










