Monday, July 27, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

पाणी व स्वच्छता कंत्राटी कर्मचारी प्रलंबित मानधनासाठी करणार धरणे आंदोलन

Solapur Mirror by Solapur Mirror
February 3, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
पाणी व स्वच्छता कंत्राटी कर्मचारी प्रलंबित  मानधनासाठी करणार धरणे आंदोलन
0
SHARES
18
VIEWS

आझाद मैदानावर साखळी उपोषण करणार सिईओ जंगम यांना निवेदन….

सोलापूर : स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) टप्पा – २ आणि जल जीवन मिशन अंतर्गत जिल्हा परिषद स्तरावर जवळपास दोन दशकांपासून कार्यरत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे चार महिन्यांचे वेतन अद्याप थकित आहे.ऑक्टोबर २०२५ ते जानेवारी २०२६ या कालावधीतील मानधन न मिळाल्यामुळे कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांच्या उपजीविकेवर गंभीर परिणाम होत आहेत त्यामुळे संघटनेच्या वतीने धरणे आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य पाणी व स्वच्छता शासकीय कंत्राटी कर्मचारी कृती समितीचे कार्याध्यक्ष सचिन जाधव यांनी दिला आहे.

या परिस्थितीबाबत महाराष्ट्र राज्य पाणी व स्वच्छता शासकीय कंत्राटी कर्मचारी कृती समितीने राज्यस्तरावर पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव यांना निवेदन देणेत आले आहे. आज सोलापूर जिल्हा परिषद परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम व उपमुख्य कार्यकारी अधिकारी ( पाणी व स्वच्छता ) अमोल जाधव यांना लेखी निवेदन सादर करून सद्यस्थितीची वस्तुनिष्ठ माहिती अवगत करून दिली आहे. यावेळी राज्य पाणी व स्वच्छता शासकीय कंत्राटी कर्मचारी कृती समितीचे कार्याध्यक्ष सचिन जाधव, शंकर बंडगर, सचिन सोनवणे,महादेव शिंदे, प्रशांत दबडे, यशवंती धत्तुरे, दिपाली व्हटे, प्रतिक्षा गोडसे, अर्चना कनकी,आनंद मोची,रत्नदीप फडतरे आदी उपस्थित होते.

राज्यात सर्व जिल्हा व तालुका स्तरावर पाणी व स्वच्छता शासकीय कंत्राटी कर्मचारी हे ग्रामपंचायतांमधील प्रत्यक्ष अंमलबजावणी, क्षेत्रीय तपासणी, लाभार्थी समन्वय, ऑनलाईन नोंदी आणि अहवाल सादरीकरण यासह जिल्हा परिषद व पंचायत समिती स्तरावरील नियोजन व देखरेखीची जबाबदारी पार पाडत आहेत.गेली चार महिने मानधन न मिळाल्याने कर्मचाऱ्यांचे घरभाडे, मुलांचे शिक्षण आणि वैद्यकीय खर्च भरणे कठीण झाले आहे.तरीही ते सेवेत सतत कार्यरत आहेत. “चार महिने मानधन न मिळाल्याने आर्थिक ताण आहे, तरीही सेवा सुरू ठेवत आहोत,” असे महाराष्ट्र राज्य पाणी व स्वच्छता शासकीय कंत्राटी कर्मचारी कृती समितीने सांगितले.सेवा सुरू असताना मानधन न मिळणे केवळ आर्थिक प्रश्न नाही, तर कर्मचाऱ्यांच्या दैनंदिन जीवनावर आणि मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम करणारे आहे.यावेळी सदर निवेदनात मानधन प्रलंबित राहणे हा जिल्हा परिषद स्तरावरील निर्णयाशी संबंधित नसून, निधी वितरण व प्रशासकीय प्रक्रियेतील विलंबामुळे झाला असल्याचे स्पष्ट केले आहे. या आंदोलनात जलजीवन मिशन, स्वच्छ भारत मिशन ग्रामीण, जलजीवन मिशन अंतर्गत वाॅश अंतर्गत तालुका स्तरावर काम करणारे कर्मचारी तसेच गटसंसाधन केंद्रातील कर्मचारी सहभागी होत असल्याचे कृती समितीचे अध्यक्ष रमाकांत गायकवाड यांनी सांगितले.

कर्मचाऱ्यांनी दिलेल्या इशारानुसार, ४ फेब्रुवारीपासून राज्यभर काम बंद..! आंदोलनाची ठाम भूमिका घेतली आहे.तसेच ९ फेब्रुवारी २०२६ नंतर राज्यस्तरावर बेमुदत धरणे आंदोलन आयोजित केले जाणार आहे.हे आंदोलन पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री महोदयांच्या निवासस्थानासमोर सुरू होईल, त्यानंतर राज्य पाणी व स्वच्छता मिशन कार्यालय परिसरात आणि मुंबईतील आझाद मैदान येथे होणार आहे. यामुळे स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत २०२६-२७ चा वार्षिक कृती आराखडा (AIP), क्षेत्रीय तपासणी, अहवाल सादरीकरण, ऑनलाईन नोंदी आणि दैनंदिन प्रशासकीय कामकाजावर प्रतिकूल परिणाम होण्याची गंभीर शक्यता व्यक्त केली जात आहे.

विभागाकडून मुख्यमंत्री यांची दिशाभूल – सचिन जाधव : राज्यातील पाणी व स्वच्छता विभागाचे शासकीय कंत्राटी कर्मचारी यांचे चार महिने पगार नाही. न्यायालयाचे निर्णयाची अंमलबजावणी नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कर्मचारी यांचे हितासाठी चांगले निर्णय घेत आहेत. मुख्यमंत्री यांनी शासन निर्णय काढून शंभर दिवस अभियानात आकृतीबंध तयार करणेचे सुचना दिले होते . त्याची अंमलबजावणी पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाने केली नाही. येत्या ९ फेब्रुवारीपासून राज्यभर काम बंद आंदोलनाची ठाम भूमिका घेतली आहे. असेही राज्य पाणी व स्वच्छता शासकीय कंत्राटी कर्मचारी कृती समितीचे कार्याध्यक्ष सचिन जाधव यांनी सांगितले.

Tags: jaljivanmissionkuldipjangamZp solapur
Previous Post

सिद्धेश्वर महाराजच्या पुराण चोरी करणाऱ्या आरोपीची निर्दोष मुक्तता..

Next Post

सोलापूर जिल्ह्यातील ३,२४५ शिक्षकांचे निवडणूक ड्युटी रद्द..!

Related Posts

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग
सोलापूर जिल्हा

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

July 27, 2026
कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या
सोलापूर जिल्हा

कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

July 27, 2026
भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क
सोलापूर जिल्हा

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा
सोलापूर जिल्हा

कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

July 27, 2026
रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन
सोलापूर जिल्हा

रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

July 27, 2026
गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..
सोलापूर जिल्हा

गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..

July 27, 2026
Next Post
सोलापूर जिल्ह्यातील ३,२४५ शिक्षकांचे निवडणूक ड्युटी रद्द..!

सोलापूर जिल्ह्यातील ३,२४५ शिक्षकांचे निवडणूक ड्युटी रद्द..!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

July 27, 2026
कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

July 27, 2026
भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025