तब्बल ६८ लाख हेक्टर पेक्षा अधिकच्या जमिनींचे नुकसान !
-२९ जिल्हे २५३ तालुके २०५९ मंडळात नुकसान !
- जिथे जिथे पिक नुकसानी झाली तिथे मदत करणार !
- जिथे घर पडली तिथे प्रधानमंत्री आवास योजनेत घर बांधून देणार !
- झोपडी असू द्या गोठा असू द्या दुकान असू द्या सर्वांच्या बांधकामाला मदत करणार !
- NDRF ची मर्यादा तीन जनावरांची आहे ती शिथिल करणार आणि सरसकट सर्व मृत जनावरांसाठी मदत करणार !
- दुधाळ जनावराला ३७५०० प्रति जनावर मदत !
- ओढकाम करणाऱ्या जनावरांना ३२ हजार प्रति जनावर मदत !
- १०० रुपये प्रति कोंबडी मागे देणार !
- खरडून गेलेल्या जमिनीला ४७ हजार प्रति हेक्टर नगदी मदत ! आणि नरेगा मार्फत ३ लाखाची मदत ! म्हणजे तब्बल साडेतीन लाख प्रति हेक्टर मदत देणार !
- विहिरींचा गाळ काढायला ३० हजार प्रति विहीर देणार !
- अतिवृष्टी बाधित भागात रस्ते वाहून गेले,पूल तुटले,विजेचे खांब पडले ह्या अश्या infrastructure साठी १० हजार कोटी खर्च करणार !
- ४५ लाख शेतकऱ्यांचा आधीच पीक विमा काढलेला आहे त्यामार्फत त्यांना प्रति हेक्टर १७ हजाराची अधिकची मदत मिळणार !
- रबी पिका साठी प्रति हेक्टर १० हजारांची अधिकची मदत मिळणार !
- विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करणार !

इतकेच नाही तर मुख्यमंत्री सहायत निधी मार्फत ह्याव्यतिरिक्त जी मदत लागेल ती केली जाणार !
जनतेच्या प्रचंड पाठिंब्याने हे सरकार आलेले आहे. त्यामुळे अशा संकटसमयी जनतेच्या पाठीमागे उभे राहण्याचे कार्य मुख्यमंत्री फडणवीस शिताफीने करत आहेत ह्यात शंका नाही..!







