सोलापूर : सोलापूर विमानतळ हे प्रतिबंधित क्षेत्र घोषित केलेले असुन पोलीस आयुक्त यांनी शहरात ड्रोन किंवा इतर मानवरहित हवाई यंत्र चालविण्यास मनाई आदेश परीत केलेला आहे. मात्र दि.१३ ऑक्टोबर २०२५ रोजी सांयकाळी ०६.४५ वाजण्याच्या सुमारास विमानतळ वॉच टॉवर नंबर ४ परीसरात कोणीतरी इसम बेकायदेशीरपणे हवेत ड्रोन उडवत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी संबंधित परिसरात शोध घेतला असता, सदरचे ड्रोन हे जहागिरदार लॉन्स, नागनाथ नगर, विमानतळाचे लगत पाठीमागे येथील कार्यक्रमामध्ये विशाल प्रकाश खरात (रा.४८, राजीवजी नगर, आम्रपाली चौक, जुना विजापुर नाका) व समद म. हनीफ शेख रा.१३९, कुर्बान हुसेन, नगर गुरुनानक चौक, सोलापूर हे दोन तरुण ड्रोन उडवित असल्याचे आढळून आले. मात्र त्यांच्याकडे ड्रोन उडविण्याची कोणतीच परवानगी नसल्याचे आढळून आल्याने संबंधित इसमांवर एमआयडीसी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. व त्यांचेकडील ड्रोन जप्त करण्यात आलेले आहे.

त्यामुळे सोलापूर शहरात ड्रोन किंवा इतर मानवरहित हवाई यंत्र चालविण्यास मनाई असल्याने कोणीही विनापरवाना ड्रोन उडवू नये. अन्यथा संबंधितांवर कायदेशिर कारवाई करण्यात येईल असा इशारा पोलीस प्रशासनाकडून देण्यात आला आहे.








