सोलापूर ; सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या पथकाने वळसंग पोलीस ठाणे हद्दीत मौजे तिल्हेहाळ येथे तीन ठिकाणी हातभट्टी दारू तयार करणाऱ्या भट्ट्यांवर छापा टाकून कारवाई केली आहे. ही कारवाई सोलापूर ग्रामीण .पोलीस अधीक्षकचे अतुल कुलकर्णी, सोलापूर ग्रामीणचे अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, , तसेच अक्कलकोट उपविभागीय पोलीस अधिकारी विलास यामावर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

या मोहिमेत सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल डोंगरे, पोलीस उपनिरीक्षक रविराज कांबळे, तसेच पोलीस हवालदार श्रीशैल माळी, सुनील कुवर, अशोक पाटील, दर्याप्पा व्हाणमोरी आणि संतोष कुंभार यांनी सहभाग घेतला. छाप्यात एकूण १,४०० लिटर गुळमिश्रित रसायन आणि बॅरलसह ₹५०,४०० किमतीचा मुद्देमाल, तसेच ७० लिटर तयार हातभट्टी दारू (किंमत अंदाजे ₹७,०००) जप्त करण्यात आली. या प्रकरणी तीन आरोपींवर गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू आहे.







