सोलापूर ; सोलापूर महानगरपालिका व जिल्हा क्रिडा कार्यालय अंतर्गत घेण्यात आलेल्या शालेयस्तरीय २०२५-२६ जय जवान जय किसान सैनिकी शाळा येथे झालेल्या खो-खो स्पर्धेत विष्णूपंत कोठे मेमोरियल इंग्लिश स्कूलचा १४ वर्षाखालील मुलींचा, संघ उपविजयी ठरला. या स्पर्धेत एकूण ४५ संघ सहभागी झाले होते. संघामधील उत्कृष्ट कामगिरीमुळे खेळाडू कु. ईशा गोगावे व कु. श्रध्दा गाजूल यांची पुणे विभागीय निवड चाचणीसाठी अहिल्यानगर येथील स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

या यशाबद्दल संस्थेचे सर्वेसर्वा आ. देवेंद्र दादा कोठे, सौ मोनिका कोठे, पुष्पा नायर मॅडम , संस्थेचे पदाधिकारी सत्यनारायण गुर्रम, रमेश यन्नम, .सूरा यांनी कौतुक केले. या खेळाडूना क्रिडा शिक्षक संपत दुस्सा यांचे मार्गदर्शन लाभले. विजेत्या खेळाडूसमवेत प्राचार्या पुष्पा नायर, निर्मलकुमार काकडे,अर्चना चौहान, क्रिडा शिक्षक संपत दुस्सा यांनी मदत केले.








