सोलापूर : सीना नदीला आलेल्या महापुरामुळे दक्षिण व उत्तर सोलापूर तालुक्यातील अनेक गावांना मोठ्या प्रमाणावर फटका बसला आहे. अनेक ठिकाणी घरांचे, रस्त्यांचे, शेतीचे तसेच जनावरांचे मोठे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला असून नागरिकांना पिण्याच्या पाण्याची आणि जनावरांच्या चाऱ्याची गंभीर कमतरता भासत आहे. पूरग्रस्त भागात जाऊन शेतकरी, ग्रामस्थ आणि स्थानिक प्रतिनिधी यांच्याशी संवाद साधून परिस्थितीचा आढावा घेतला. प्रशासनाशी समन्वय साधून आवश्यक ती तातडीची मदत, बचावकार्य आणि पुनर्वसनाच्या उपाययोजना राबविण्याचे निर्देश दिले आहेत.

ही आपत्ती निश्चितच मोठी आहे, पण आपल्या सर्वांच्या एकजुटीने आणि परस्पर सहकार्याने आपण या संकटावर नक्कीच मात करू. पूरग्रस्त गावांतील प्रत्येक नागरिकासोबत आपण ठामपणे उभे आहोत, या कठीण काळात शासन आणि प्रशासन तुमच्या मदतीसाठी सदैव तत्पर असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त केला.








