सोलापूर: महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे (शाखा – दक्षिण सोलापूर) यांच्या वतीने आगामी २८ फेब्रुवारी रोजी एका विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची पुण्यतिथी आणि कविवर्य वि. वा. शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांची जयंती तसेच ‘मराठी भाषा गौरव दिना’चे औचित्य साधून हा कार्यक्रम पार पडणार आहे.

प्रसिद्ध सिने व नाट्य अभिनेते मा. श्री. योगेशजी सोमण हे या कार्यक्रमात ‘स्वातंत्र्यवीर सावरकर आणि मराठी भाषा’ या विषयावर आपले विचार मांडणार आहेत. सावरकरांचे भाषेतील योगदान आणि मराठी भाषेचे महत्त्व यावर प्रकाश टाकणारे हे अभ्यासपूर्ण व्याख्यान सोलापूरकरांसाठी वैचारिक मेजवानी ठरणार आहे.










