Saturday, December 6, 2025
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

शहर गुन्हे शाखेकडून 1 लाख किंमतीचा अंमली पदार्थ जप्त..

राजेश भोई by राजेश भोई
October 29, 2025
in क्राईम, सोलापूर जिल्हा
0
शहर गुन्हे शाखेकडून 1 लाख किंमतीचा अंमली पदार्थ जप्त..
0
SHARES
8
VIEWS

सोलापूर : सोलापूर शहरामध्ये अंमली पदार्थ खरेदी-विक्री करणाऱ्या इसमांचा शोध घेवून त्यांचेवर कठोर कारवाई करणेबाबत मा. एम. राज कुमार, पोलीस आयुक्त सोलापूर शहर, डॉ. अश्वीनी पाटील, पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, सोलापूर शहर यांनी गुन्हे शाखेकडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना मार्गदर्शन करून आवश्यक त्या सुचना दिल्या होत्या. त्याअनुषंगाने, दिनांक २८/१०/२०२५ रोजी गुन्हे शाखेकडील नेमणूकीस असलेले ग्रेडपोसई शामकांत जाधव, पोह/बापु साठे व त्यांचे तपास पथक अवैध अंमली पदार्थ खरेदी-विक्री करणारे इसमांवर कारवाई करणेकरीता शहर हद्दित पेट्रालिंग करीत असताना त्यांना गोपनिय बातमी प्राप्त झाली की, ” एक इसम सोलापूर एस.टी. स्टैंड परिसरामध्ये Mephedrone (एम.डी.) अंमली पदार्थ विक्री करण्यासाठी येणार आहे”. प्राप्त बातमी अरविंद माने वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा यांना अवगत करून त्यांचे सूचनेप्रमाणे व मार्गदर्शनाखाली ग्रेपोसई शामकांत जाधव व तपास पथक असे सोलापूर एस.टी.स्टँड परिसरामध्ये गेले. त्या ठिकाणी त्यांनी प्राप्त बातमीचे अनुषंगाने पाहणी केली असता एक इसम संशयास्पद स्थितीत थांबल्याचे दिसून आले. त्यावेळी त्यास शिताफीने ताब्यात घेवून त्याचे नाव-पत्ता विचारून त्याची अंगझडती घेतली असता त्याचे पँटचे खिशामध्ये एका प्लास्टीक पाऊचमध्ये पांढऱ्या रंगाची Mephedrone (एम.डी.) सदृश्य पावडर मिळून आली.

म्हणून तात्काळ पोलीस आयुक्तालय सोलापूर शहर कडील फॉरेन्सिक टिमला पाचारण करून सदर पावडरची रासायनीक तपासणी केली असता सदरची पावडर ही Mephedrone (एम.डी.) अंमली पदार्थ असल्याचे निष्पन्न झाले. त्यावरून नमूद इसम नामे मोहमद अझहर हैदरसाहेब कुरेशी, वय-३७ वर्षे रा.१३३८/३ भिमपुरा लेन, सेंटर स्ट्रीट कॅम्प, पुणे यास ताब्यात घेवून त्याचेकडे अधिक चौकशी केली असता त्याने Mephedrone (एम.डी.) अंमली पदार्थ सोलापूर शहरामध्ये विक्री करीता घेवून आल्याचे सांगितले. त्यानंतर नमूद इसमाविरूध्द फौजदार चावडी पोलीस ठाणे, सोलापूर शहर येथे गुरनं ७५२/२०२५ एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८ (क), २२ (ब), २९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नमूद गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेकडील सहा. पोलीस निरीक्षक दत्तात्रय काळे हे करीत आहेत. तपासामध्ये आरोपी नामे-मोहमद अझहर हैदरसाहेब कुरेशी याने सदरचा अंमली पदार्थ हा मुंबई येथून घेवून आल्याचे निष्पन्न झाले असून त्या दृष्टीने पुढील तपास/कारवाई चालू आहे.

सदरची कामगिरी पोलीस आयुक्त सोलापूर शहर, एम. राज कुमार, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे/वि.शा.)डॉ. अश्वीनी पाटील, सहा. पोलीस आयुक्त राजन माने, यांचे मार्गदर्शना खाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा चे अरविंद माने, , स.पो.नि. दत्तात्रय काळे, ग्रे.पो.स.ई. शामकांत जाधव व त्यांचे तपास पथकातील पोलीस अंमलदार बापू साठे, सैपन सय्यद, वसिम शेख, सुभाष मुंढे, अनिल जाधव, कुमार शेळके, मच्छिद्र राठोड व प्रकाश गायकवाड यांनी केली आहे

Previous Post

तिल्हेहाळ येथे वळसंग पोलिसांचा हातभट्टी दारूवर विशेष छापा

Next Post

राजन पाटलांकडून भाजपचे लोकं शिव्या शिकतील ; उमेश पाटलांचा हल्लाबोल,

Related Posts

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या अक्कलकोटमध्ये; जाहीर सभेचे आयोजन
राजकारण

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या अक्कलकोटमध्ये; जाहीर सभेचे आयोजन

November 29, 2025
सावकाराच्या तगाद्याने इसमाची आत्महत्या; आत्महत्येपूर्वी मोबाईलमध्ये व्हिडिओ केला रेकॉर्ड
क्राईम

सावकाराच्या तगाद्याने इसमाची आत्महत्या; आत्महत्येपूर्वी मोबाईलमध्ये व्हिडिओ केला रेकॉर्ड

November 29, 2025
तिहेरी घरफोडी करणाऱ्या दोन आंतरराज्य गुन्हेगारांना अटक
क्राईम

तिहेरी घरफोडी करणाऱ्या दोन आंतरराज्य गुन्हेगारांना अटक

November 29, 2025
हुतात्मा, इंद्रायणी एक्स्प्रेस जानेवारीत १० दिवस रद्द
सोलापूर जिल्हा

हुतात्मा, इंद्रायणी एक्स्प्रेस जानेवारीत १० दिवस रद्द

November 27, 2025
सोलापुरात चिमुकला खेळताना ट्रॅक्टरवर चढला.. गिअर पडल्यामुळे विहिरीत कोसळला, १२ तासांनी मृतदेह हाती
सोलापूर जिल्हा

सोलापुरात चिमुकला खेळताना ट्रॅक्टरवर चढला.. गिअर पडल्यामुळे विहिरीत कोसळला, १२ तासांनी मृतदेह हाती

November 27, 2025
शिक्षण उपनिरीक्षकाच्या केबिनमधून १.२० लाख तर घरातून ५६ हजार जप्त..!
महाराष्ट्र

शिक्षण उपनिरीक्षकाच्या केबिनमधून १.२० लाख तर घरातून ५६ हजार जप्त..!

November 27, 2025
Next Post
राजन पाटलांकडून भाजपचे लोकं शिव्या शिकतील ; उमेश पाटलांचा हल्लाबोल,

राजन पाटलांकडून भाजपचे लोकं शिव्या शिकतील ; उमेश पाटलांचा हल्लाबोल,

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025