सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात पुढे करत सोनाई फाउंडेशन व आधार हॉस्पिटल यांच्या यांच्यावतीने सिंदखेड गावच्या विस्थापित नागरिकांसाठी मोफत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले.सिंदखेड गावाला प्रशासनाने पूरस्थितीचा धोका असल्याने नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्याचे आवाहन केले होते. यानुसार गावकऱ्यांची आहेरवाडी येथील कोनापुरे शाळेत तात्पुरती व्यवस्था करण्यात आली आहे. या ठिकाणी आरोग्य शिबिर घेऊन नागरिकांची मोफत तपासणी करण्यात आली. त्याचबरोबर गरजूंना मोफत औषधांचेही वाटप करण्यात आले.पूरामुळे आरोग्याच्या विविध समस्या निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन हे शिबिर घेण्यात आले. यावेळी नागरिकांनी या उपक्रमाचे समाधान व्यक्त करत सोनाई फाउंडेशन व आधार हॉस्पिटलचे आभार मानले..









