Wednesday, May 20, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

ओला दुष्काळाच्या सर्व सवलती लागू; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

SOLAPUR MIRROR by SOLAPUR MIRROR
September 30, 2025
in Uncategorized
0
ओला दुष्काळाच्या सर्व सवलती लागू; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
0
SHARES
51
VIEWS

मुंबई : महाराष्ट्रभर झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. यामुळे विरोधकांकडून राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होत आहे. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज यापूर्वी राज्यात केव्हाही ओला दुष्काळ जाहीर झाला नसल्याचे स्पष्ट केले. तसेच दुष्काळ काळात लागू करण्यात येणाऱ्या सर्व उपाययोजना सध्याच्या काळात लागू करण्याचा निर्णय सरकारने घेतल्याचे ते म्हणाले. सरकारकडून करण्यात येणारी मदत शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी पोहोचती केली जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी प्रामुख्याने अधोरेखित केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीनंतर बोलताना फडणवीसांनी उपरोक्त माहिती दिली. ते म्हणाले, मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेत. गेल्या काही महिन्यांत महाराष्ट्रात सातत्याने अतिवृष्टी झाली. त्यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. या प्रकरणी लाखो हेक्टरचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सरकारने ऑगस्टपर्यंतच्या नुकसानीसाटी 2215 कोटी रुपये वितरित करणे सुरू केले आहे. ई-केवायसीची अट शिथिल करून हे पैसे देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यासंदर्भातील कारवाई सरकारने सुरू केली आहे.

ते पुढे म्हणाले, पावसामुळे झालेल्या नुकसानीची आकडेवारी पुढील दोन-तीन दिवसांत आमच्यापर्यंत पोहोचेल. काही ठिकाणी पाणी असल्यामुळे योग्य प्रकारे असेसमेंट करता येत नव्हते. पण पुढच्या 2-3 दिवसांत ही संपूर्ण माहिती आच्यापर्यंत पोहोचले. त्यानंतर शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे एक सर्वंकष धोरण तयार करून त्यांना योग्य ती मदत केली जाईल. या सर्व मदतीची घोषणा पुढच्या आठवड्यात केली जाईल. विशेषतः शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी सर्व मदत मिळावी असा सरकारचा प्रयत्न आहे.

फडणवीस पुढे म्हणाले, राज्यात सातत्याने ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होत असते. पण मॅन्युअलमध्ये ओला दुष्काळ कुठेही नाही. आजपर्यंत कधीही ओला दुष्काळ जाहीर झाला नाही. तथापि, सरकारने हा निर्णय घेतला आहे की, ज्यावेळी दुष्काळ पडतो, ज्यावेळी ज्या – ज्या उपाययोजना व सवलती आप देतो, त्या सगळ्या सवलती आत्ता लागू केल्या जातील. मुळात ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीचा अर्थच असा असतो की, दुष्काळ काळातील सवलती लागू झाल्या पाहिजेत. सरकारने या सर्व सवलती लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.

Previous Post

दक्षिण सोलापूर तालुक्यातील पूरग्रस्तांसाठी सोनाई फाउंडेशन व आधार हॉस्पिटल यांच्या मदतीचा हात…

Next Post

विजयादशमी आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त वाहतूक मार्गात बदल…

Related Posts

सोलापुरातील वाहनधारकांना फटका; पेट्रोल ३.१४ रुपयांनी तर डिझेल ३.१० रुपयांनी महाग
Uncategorized

सोलापुरातील वाहनधारकांना फटका; पेट्रोल ३.१४ रुपयांनी तर डिझेल ३.१० रुपयांनी महाग

May 15, 2026
A.D. जोशी ज्युनिअर कॉलेजमध्ये अकरावी प्रवेश प्रक्रियेला उत्स्फूर्त प्रतिसाद
Uncategorized

A.D. जोशी ज्युनिअर कॉलेजमध्ये अकरावी प्रवेश प्रक्रियेला उत्स्फूर्त प्रतिसाद

May 12, 2026
तीन सराईत गुन्हेगार सोलापूर शहर व जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार
Uncategorized

तीन सराईत गुन्हेगार सोलापूर शहर व जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार

May 6, 2026
महापालिकेत १०९ अधिकारी-कर्मचाऱ्यांना पदोन्नती; चौबे, मठपती कार्यकारी अभियंता
Uncategorized

महापालिकेत १०९ अधिकारी-कर्मचाऱ्यांना पदोन्नती; चौबे, मठपती कार्यकारी अभियंता

May 5, 2026
जुळे सोलपुरातील डी मार्ट परिसरात अतिक्रमणविरोधात कारवाई
Uncategorized

जुळे सोलपुरातील डी मार्ट परिसरात अतिक्रमणविरोधात कारवाई

April 23, 2026
मालमत्तेचे प्रश्न सोडवण्यासाठी गुंठेवारी शिबिराचा लाभ घ्या; नागरिकांना महापौरांचे आवाहन.
Uncategorized

मालमत्तेचे प्रश्न सोडवण्यासाठी गुंठेवारी शिबिराचा लाभ घ्या; नागरिकांना महापौरांचे आवाहन.

April 23, 2026
Next Post
विजयादशमी आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त वाहतूक मार्गात बदल…

विजयादशमी आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त वाहतूक मार्गात बदल…

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मान्सूनपूर्व तयारीला वेग; सर्व यंत्रणांनी सज्ज राहा ; अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांचे निर्देश

मान्सूनपूर्व तयारीला वेग; सर्व यंत्रणांनी सज्ज राहा ; अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांचे निर्देश

May 19, 2026
जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग ; १८ जूनला मतदान, २५ जूनपर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण

जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग ; १८ जूनला मतदान, २५ जूनपर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण

May 19, 2026
पर्यावरणपूरक संदेश देत महापौरसह उपमहापौर  ई-बाईकवरून महापालिकेत दाखल

पर्यावरणपूरक संदेश देत महापौरसह उपमहापौर ई-बाईकवरून महापालिकेत दाखल

May 18, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025