सोलापूर : ऑगस्ट २०२५ मध्ये महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांमध्ये अवकाळी आणि अतिवृष्टीमुळे शेती क्षेत्राला मोठा फटका बसला होता. अतिवृष्टीने शेतातील पिके, फळबागा आणि शेतजमिनी यांचे प्रचंड नुकसान केले, ज्यामुळे हजारो शेतकरी कुटुंबे आर्थिक संकटात सापडली. या आपत्तीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या मदतीसाठी नवीन आणि सुधारित नुकसान भरपाई निकष जाहीर केले आहेत. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना प्रति हेक्टर ₹२२,५०० पर्यंतची आर्थिक मदत मिळू शकते. सरकारच्या या निर्णयामुळे पूरग्रस्त शेतकऱ्यांना पुन्हा उभे राहण्यासाठी आर्थिक आधार मिळणार आहे.
पिक नुकसानीसाठी वर्गवार आर्थिक मदत
राज्य सरकारने विविध प्रकारच्या शेती पद्धतींच्या नुकसानीनुसार वेगवेगळ्या दरात मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांना मिळणारी ही मदत त्यांच्या पिकाच्या प्रकारावर आधारित असेल. जिरायती म्हणजेच कोरडवाहू शेतीसाठी प्रति हेक्टर ₹८,५०० ची मदत देण्यात येणार असून किमान ₹१,००० ची हमी दिली जाईल. बागायत शेती म्हणजेच सिंचनाखालील शेतीसाठी प्रति हेक्टर ₹१७,००० आणि किमान ₹२,००० अशी तरतूद ठेवण्यात आली आहे. फळबागांच्या नुकसानीसाठी सर्वाधिक म्हणजे प्रति हेक्टर ₹२२,५०० आणि किमान ₹२,५०० ची मदत मिळणार आहे.

शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावे की यापूर्वी तीन हेक्टरपर्यंत मिळणारी मदत आता केवळ दोन हेक्टरपर्यंत मर्यादित करण्यात आली आहे. हा बदल सरकारने नवीन धोरणांतर्गत लागू केला असून शेतकऱ्यांनी त्यानुसार आपले दावे सादर करणे आवश्यक आहे. या निकषांनुसार मोठ्या प्रमाणात शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना अधिक लक्ष देण्यात येणार असून प्रत्येक पात्र शेतकऱ्याला या सवलतीचा लाभ मिळेल याची दक्षता घेतली जाईल. सोलापूर कृषी अधीक्षक शुक्राचार्य भोसले यांनी दिली माहिती…
हेक्टरी एवढी रक्कम मंजूर शासन जीआर प्रमाणे..
जिरायात पिके: 8500 (हेक्टरी)
बगायत पिके : 17.000 (हेक्टरी)
फळे उत्पादन पिके : 22500 (हेक्टरी)







