Monday, July 27, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

मंगळवारपासून सांगोला महाविद्यालयात रंगणार युवा महोत्सव ;डॉ. केदारनाथ काळवणे यांनी दिली माहिती..!

Solapur Mirror by Solapur Mirror
October 4, 2025
in Uncategorized
0
मंगळवारपासून सांगोला महाविद्यालयात रंगणार युवा महोत्सव ;डॉ. केदारनाथ काळवणे यांनी दिली माहिती..!
0
SHARES
19
VIEWS

विद्यार्थी विकास विभागाकडून कार्यक्रमाची रूपरेषा जाहीर!

सोलापूर, दि. 4- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा 21 वा उन्मेश सृजनरंगाचा युवा महोत्सव सांगोला महाविद्यालय सांगोला येथे होणार असून मंगळवार, दि. 7 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी दहा वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा पार पडणार असल्याची माहिती  विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. केदारनाथ काळवणे यांनी दिली.
मंगळवारी सकाळी दहा वाजता विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानवर यांच्या अध्यक्षतेखाली सुप्रसिद्ध लोककलाकार व लोककलेचे अभ्यासक डॉ. योगेश चिकटगावकर यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. लक्ष्मीकांत दामा, सांगोला तालुका उच्च शिक्षण मंडळाचे अध्यक्ष बाबुराव गायकवाड, विद्यापीठाचे प्रभारी कलसचिव डॉ. अतुल लकडे, सांगोला महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. सुरेश भोसले यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
दि. 7 ते 10 ऑक्टोबर 2025 या कालावधीत नृत्य, नाट्य, लोककला, ललित, वांग्मय, संगीत विभागातील एकूण 39 कलाप्रकारांचे सादरीकरण या युवा महोत्सवात होणार आहे. सुमारे 60 महाविद्यालये आणि जवळपास 1600 विद्यार्थी कलाकारांचा यामध्ये सहभाग राहणार आहे. युवा महोत्सवाच्या पहिल्या दिवशी मंगळवार, दि. 7 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी आठ वाजता नोंदणी, उद्घाटन सोहळा, संघ व्यवस्थापकांची बैठक, लावणी, समूह गायन (भारतीय),  कातरकाम, मूक अभिनय, प्रश्नमंजुषा (लेखी), वक्तृत्व मराठी, भारुड, काव्यवाचन, भित्तीचित्रण, मेहंदी, भजन आणि एकांकिकेचे सादरीकरण होणार आहे.

बुधवार, दि. 8 ऑक्टोबर रोजी शास्त्रीय नृत्य, सुगम गायन, वक्तृत्व इंग्रजी, पथनाट्य, स्थळचित्रण, लोक वाद्यवृंद, जलसा, स्थळ छायाचित्रण, पोवाडा, शास्त्रीय सुरवाद्य, कथाकथन, मिमिक्री, व्यंगचित्र, कव्वाली आणि एकांकिका आदी स्पर्धा पार पडतील. गुरुवार दि. 9 ऑक्टोबर रोजी प्रश्नमंजुषा (तोंडी), निर्मिती चित्र, शास्त्रीय गायन, पाश्चात्य समूहगायन, वक्तृत्व हिंदी, पाश्चिमात्य गायन, रांगोळी, शास्त्रीय तालवाद्य, मातीकाम आणि लोकनृत्याच्या स्पर्धा रंगतील.

शुक्रवार, दि. 10 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 8 वाजता शोभायात्रा पार पडल्यानंतर दुपारी सव्वा बारा वाजता पारितोषिक वितरण समारंभ होणार आहे. ज्येष्ठ अभिनेते मकरंद अनासपुरे, कुलगुरू प्रकाश महानवर आणि मान्यवरांच्या हस्ते विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण केले जाणार आहे. या युवा महोत्सवात विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयातील युवा विद्यार्थी कलावंतांनी मोठ्या उत्साहाने सहभागी व्हावे, असे आवाहन विद्यापीठ प्रशासनातर्फे विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. केदारनाथ काळवणे यांनी केले आहे.

साउंड, निवास, भोजन व्यवस्था चोख
यंदाच्या युवा महोत्सवाचे यजमान सांगोला महाविद्यालयाकडून जोरदार तयारी सुरू आहे. संस्थेचे अध्यक्ष बाबुराव गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थी, परीक्षक, मान्यवर यांच्या भोजन, निवास आदी व्यवस्थेचे चोख नियोजन करण्यात आले आहे. महत्त्वाचे म्हणजे मुख्य रंगमंच आणि इतर स्पर्धेसाठी चार ते पाच मोठे रंगमंचाची चोख व्यवस्था करण्यात आली आहे. कलाप्रकार सादरीकरणासाठी उत्तम साऊंड व्यवस्था ठेवण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थी कलाकारांना कोणतीच अडचण भासणार नसल्याचा विश्वास विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. केदारनाथ कळवणे यांनी व्यक्त केला आहे.

Previous Post

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 2 हेक्टरीचं मिळणार मदत, ही मदत शेतकऱ्यांना मान्य नाही..

Next Post

‘लाडक्या बहिणीं’चे वाढले टेंशन

Related Posts

आषाढी वारीसाठी आरोग्य विभाग पूर्णपणे सज्ज!
Uncategorized

आषाढी वारीसाठी आरोग्य विभाग पूर्णपणे सज्ज!

July 19, 2026
सोलापूर बार असोसिएशन निवडणुकीचे बिगुल; अध्यक्षपदासाठी दोन दिग्गज मैदानात
Uncategorized

सोलापूर बार असोसिएशन निवडणुकीचे बिगुल; अध्यक्षपदासाठी दोन दिग्गज मैदानात

July 11, 2026
शहर पोलिस दलातील चार अधिकाऱ्यांना पदोन्नती; नव्या जबाबदाऱ्यांची धुरा
Uncategorized

शहर पोलिस दलातील चार अधिकाऱ्यांना पदोन्नती; नव्या जबाबदाऱ्यांची धुरा

June 24, 2026
‘एकही मत वाया नको’ : राजाभाऊंच्या विजयासाठी शिंदेंचे दूत सोलापुरात सक्रिय
Uncategorized

‘एकही मत वाया नको’ : राजाभाऊंच्या विजयासाठी शिंदेंचे दूत सोलापुरात सक्रिय

June 18, 2026
मतदानात ‘उत्तर सोलापूर’ अव्वल तर ‘पंढरपूर’ संथ; पहिल्या टप्प्यात जिल्ह्यात ११.८५ टक्के मतदान
Uncategorized

मतदानात ‘उत्तर सोलापूर’ अव्वल तर ‘पंढरपूर’ संथ; पहिल्या टप्प्यात जिल्ह्यात ११.८५ टक्के मतदान

June 18, 2026
पोलीस आयुक्तांच्या उपस्थितीत जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांचे स्वागत
Uncategorized

पोलीस आयुक्तांच्या उपस्थितीत जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांचे स्वागत

June 15, 2026
Next Post
‘लाडक्या बहिणीं’चे वाढले टेंशन

‘लाडक्या बहिणीं’चे वाढले टेंशन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

July 27, 2026
रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

July 27, 2026
गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..

गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..

July 27, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025