सोलापूर ; जिल्हा परिषद पत्रकार संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत नवीन पदाधिकारी निवडीची प्रक्रिया गुरूवारी दुपारी जिल्हा परिषदेच्या शिवरत्न सभागृहात श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे यांच्या अध्यक्षतेखाली व राज्य अधिस्वीकृती पत्रकार सदस्य प्रमोद बोडके यांच्या नेतृत्वाखाली संपन्न झाली. यावेळी दैनिक पुढारीचे प्रतिनिधी अमोल साळुंखे यांची अध्यक्षपदी तर दैनिक तरुण भारतचे पत्रकार अमोगसिदध मुंजे व विश्वनाथ बिराजदार, खजिनदारपदी दैनिक संचारचे प्रतिनिधी हरिभाऊ कदम, सचिवपदी इन न्युज चॅनलचे रवि बगले तर सहसचिवपदी जनता राज्य न्युज चॅनलच्या रेणुका वठारे यांची निवड करण्यात आली .

निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ज्येष्ठ पत्रकार प्रमोद बोडके यांनी काम पाहीले. यावेळी बळीराम सर्वगोड, शरीफ सय्यद , राजकुमार सारोळे, सचिन जाधव, अप्पासाहेब पाटील, अनिल शिराळकर, संदीप यरवडे, शिवाजी सावंत श्रीशैल चिंचोळकर, विश्वनाथ व्हनकोरे, विजयकुमार झुंजा, मनोज भालेराव, राजेश भोई, संतोष अचलारे, गिरमला गुरव ,रवि बगले, प्रशांत कटारे, सुदर्शन तेलंग आदी उपस्थित होते .
आमचे मार्गदर्शक आणि मित्र पुढारीचे पत्रकार अमोल साळुंखे यांची सोलापूर जिल्हा परिषद पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल एकनाथ स्वाभिमानी शिक्षक सेनेच्या वतीने सत्कार करून शुभेच्छा दिल्या यावेळी एकनाथ स्वाभिमानी शिक्षक सेनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते








