सोलापूर : विजापूर रोड सोलापूर येथील ए. जी. पाटील पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूट मध्ये महिला दिनाचे औचित्य साधून महाविद्यालयात कार्यरत जागृती महिला मंचच्या वतीने डॉक्टर शालिनी मस्के यांचे “योग, आहार व विहार” या विषयावरती व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. डॉक्टर शालिनी मस्के या प्रमुख वक्त्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या. या कार्यक्रमाला प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षातील विद्यार्थिनी आणि महाविद्यालयातील सर्व महिला स्टाफ उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने करण्यात आली. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे कॅम्पस डायरेक्टर व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम ए चौगुले, प्रमुख वक्ते डॉक्टर शालिनी मस्के व जागृती महिला विचार मंचाच्या समन्वयक सौ लक्ष्मी बिराजदार होते.
स्त्रियांच्या शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी संतुलित व पौष्टिक आहार किती महत्त्वाचा आहे यावर त्यांनी प्रकाश टाकला. जीवनाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर जसे तारुण्य, गर्भधारणा व रजो निवृत्ती यामध्ये विशिष्ट पोषक तत्वांची गरज असते. सक्रिय जीवनासाठी आणि शरीरातील ऊर्जा पातळी टिकून ठेवण्यासाठी सकस आहार अत्यंत महत्त्वाचा ठरतो. त्याचबरोबर वाढत्या वयाबरोबर महिलांचे हर्मोनल संतुलन, रोगप्रतिकारशक्ती, हाडांचे आरोग्य व पचन संस्था सुधारण्यासाठी योग्य संतुलित फायबर युक्त, कॅल्शियम व लोह हे ॲनिमिया सारख्या आजारांना प्रतिबंध करतो. आहारामध्ये दररोज डाळी, पालेभाज्या, कोशिंबीर व ताक त्यांचा समावेश करणे खूप गरजेचे आहे असे त्यांनी सांगितले. आहारावरून विचार ठरतात विचार आयुष्याला दिशा देतात. तणाव विरहित निरोगी व उत्साही जीवनशैलीसाठी योग्य आहार खूप महत्त्वाचे ठरतो असे त्यांनी म्हटले.
याबरोबरच जागृती महिला विचार मंच अंतर्गत झालेल्या स्पीच कॉम्पिटिशन, फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन व मिमिक्री कॉम्पिटिशन या स्पर्धेतील विजेत्या मुलींना प्रमुख पाहुणे व प्रमुख वक्ते डॉक्टर शालिनी मस्के यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.कार्यक्रमाची सांगता स्त्रीशक्ती कवितेने झाली. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता जागृती महिला विचार मंचाच्या मुख्य समन्वयक लक्ष्मी बिराजदार विभागवार समन्वयक सुजाता डोके, जयश्री सचदेव, ऐश्वर्या सोलनकर, करिष्मा शेख, वृषाली शेटे व संज्योत मरेड्डी यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तृतीय वर्ष इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकमुनिकेशन इंजीनियरिंग विभागाची कुमारी नेहा कुलकर्णी येणे केले तर आभार प्रदर्शन सिव्हिल इंजिनिअरिंग विभागाच्या प्राध्यापिका ऐश्वर्या सोलनकर यांनी मानले. या कार्यक्रमाकरिता संस्थेचे अध्यक्ष सिद्धेश्वर अण्णाराव पाटील, संस्थेचे सचिव शिवानंद सिद्धेश्वर पाटील, संस्थेचे कॅम्पस डायरेक्ट व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम ए चौगुले आणि उपप्राचार्य एस के मोहिते यांचे मार्गदर्शन लाभले.










