Wednesday, May 20, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

निधी मंजूर, पण काम बंद; मराठी भवनसाठी मंत्री आशिष शेलार यांचे आश्वासन

SOLAPUR MIRROR by SOLAPUR MIRROR
March 20, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
निधी मंजूर, पण काम बंद; मराठी भवनसाठी मंत्री आशिष शेलार यांचे आश्वासन
0
SHARES
6
VIEWS

सोलापूर,:-पार्क चौकातील शुभराय आर्ट गॅलरीच्या जागेवरील रखडलेल्या मराठी भवनचे बांधकाम तातडीने सुरू करावे अशी मागणी महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा दक्षिण सोलापूरच्या वतीने राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांच्याकडे निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली. यावेळी कार्याध्यक्ष प्रशांत बडवे, कार्यवाह जितेश कुलकर्णी, कोषाध्यक्ष अमोल धाबळे, सल्लागार अविनाश महागांवकर, प्रसिध्दी प्रमुख विनायक होटकर, भारतीय जनता पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, आदी उपस्थित होते.

महाराष्ट्रातील सोलापूर हे महत्वाचे शहर आहे. मराठी साहित्य, नाट्य,संगीत आणि विविध कला समृध्द करण्यासाठी सोलापूर मधून अनेकांनी योगदान दिले आहे. अनेक प्रतिभावंत साहित्यिक, कलावंत या सोलापूरने महाराष्ट्राला दिले. कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्र या तीन राज्यांच्या सीमेवर असूनही मराठी भाषेची वृध्दी करण्यात सोलापूर हे अग्रेसर आहे. या सर्व पार्श्‍वभूमीवर सोलापूरमध्ये मराठी भवन असावे त्यातील एका विभागाला स्वर्गिय दत्ता हलसगीकर यांचे नाव द्यावे अशी अपेक्षा महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा दक्षिण सोलापूर यांच्या वतीने तत्कालीन आमदार आणि विद्यमान खासदार प्रणिती शिंदे यांच्याकडे व्यक्त करण्यात आली होती त्यानुसार स्व. डॉ.वासुदेव रायते, हास्यसम्राट प्रा.दिपक देशपांडे, प्रशांत बडवे, रवी हलसगीकर यांचे शिष्टमंडळ आ. प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना भेटून मराठी भवनच्या मागणीचे निवेदन देण्यात आले. त्यावर सकारात्मकपणे प्रतिसाद देत तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सहकार्य करण्याचे आश्‍वासन दिले. त्यानंतर गेल्या 7 ते 8 वर्षापासून मराठी भवनच्या मागणीचा पाठपुरावा करून आ. प्रणिती शिंदे यांनी सोलापूरमध्ये मराठी भवन तयार करण्यासाठी राज्य शासनाकडून निधी मंजूर करून आणला. त्याबाबतचा आदेशही जिल्हा प्रशासलाना प्राप्त झाला. त्यानुसार बांधकामाला सुरूवात झाली परंतु गेल्या दोन वर्षापासून हे बांधकाम बंद अवस्थेत आहे.

त्याचा पाठपुरावा म्हणून आणि मराठी भवन लवकरात लवकर सोलापूरकरांना उपलब्ध व्हावे या हेतुने राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार हे कार्यक्रमानिमित्त शहाजी पवार यांच्या घरी आले होते त्यावेळी त्यांना मराठी भवनचे बांधकाम तातडीने सुरू करावे यासाठी निवेदन देण्यात आले. त्यावर त्यांनी सोलापूरच्या मराठी भवनचे काम सुरू करण्यासाठी प्रयत्न करू असे आश्‍वासन दिले. महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा दक्षिण सोलापूरचे कार्याध्यक्ष प्रशांत बडवे, कार्यवाह जितेश कुलकर्णी, कोषाध्यक्ष अमोल धाबळे, प्रसिध्दी प्रमुख विनायक होटकर, सल्लागार अविनाश महागांवकर यांच्या हस्ते हे निवेदन नामदार आशिष शेलार यांना देण्यात आले यावेळी शहाजी पवार, इंद्रजित पवार आदि उपस्थित होते

या मध्ये शॉर्ट हेडिंग द्या

Previous Post

फलोत्पादन व खारभूमी विकास मंत्री भरत गोगावले यांचा सोलापूर जिल्हा दौरा

Next Post

23 व 25 मार्च रोजी जिल्हास्तरीय कृषि व धान्य महोत्सवाचे आयोजन

Related Posts

मान्सूनपूर्व तयारीला वेग; सर्व यंत्रणांनी सज्ज राहा ; अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांचे निर्देश
सोलापूर जिल्हा

मान्सूनपूर्व तयारीला वेग; सर्व यंत्रणांनी सज्ज राहा ; अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांचे निर्देश

May 19, 2026
जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग ; १८ जूनला मतदान, २५ जूनपर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण
सोलापूर जिल्हा

जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग ; १८ जूनला मतदान, २५ जूनपर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण

May 19, 2026
पर्यावरणपूरक संदेश देत महापौरसह उपमहापौर  ई-बाईकवरून महापालिकेत दाखल
सोलापूर जिल्हा

पर्यावरणपूरक संदेश देत महापौरसह उपमहापौर ई-बाईकवरून महापालिकेत दाखल

May 18, 2026
मंद्रूप येथील शेततळ्यात बुडून दोन शाळकरी मुलांचा दुर्दैवी मृत्यू
सोलापूर जिल्हा

मंद्रूप येथील शेततळ्यात बुडून दोन शाळकरी मुलांचा दुर्दैवी मृत्यू

May 18, 2026
राजू शेट्टी यांच्या शक्तीपीठ महामार्गाला माढ्यात तीव्र विरोध ; “एक इंचही जमीन देणार नाही”चा निर्धार
सोलापूर जिल्हा

राजू शेट्टी यांच्या शक्तीपीठ महामार्गाला माढ्यात तीव्र विरोध ; “एक इंचही जमीन देणार नाही”चा निर्धार

May 17, 2026
विजापूर रोड हद्दीत घरफोडी करणाऱ्या ‘मंत्री’ला ४८ तासांत केले गजाआड
क्राईम

विजापूर रोड हद्दीत घरफोडी करणाऱ्या ‘मंत्री’ला ४८ तासांत केले गजाआड

May 17, 2026
Next Post
23 व 25 मार्च रोजी जिल्हास्तरीय कृषि व धान्य महोत्सवाचे आयोजन

23 व 25 मार्च रोजी जिल्हास्तरीय कृषि व धान्य महोत्सवाचे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मान्सूनपूर्व तयारीला वेग; सर्व यंत्रणांनी सज्ज राहा ; अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांचे निर्देश

मान्सूनपूर्व तयारीला वेग; सर्व यंत्रणांनी सज्ज राहा ; अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांचे निर्देश

May 19, 2026
जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग ; १८ जूनला मतदान, २५ जूनपर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण

जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग ; १८ जूनला मतदान, २५ जूनपर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण

May 19, 2026
पर्यावरणपूरक संदेश देत महापौरसह उपमहापौर  ई-बाईकवरून महापालिकेत दाखल

पर्यावरणपूरक संदेश देत महापौरसह उपमहापौर ई-बाईकवरून महापालिकेत दाखल

May 18, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025