Monday, July 27, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

सोरेगाव येथे ‘महाराजस्व अभियान’ अंतर्गत ‘समाधान शिबिर’ संपन्न; शेकडो नागरिकांचे प्रश्न मार्गी!

Solapur Mirror by Solapur Mirror
April 18, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
सोरेगाव येथे ‘महाराजस्व अभियान’ अंतर्गत ‘समाधान शिबिर’ संपन्न; शेकडो नागरिकांचे प्रश्न मार्गी!
0
SHARES
16
VIEWS

हद्दवाढ भागातील नगरसेवकांनी लावली हजेरी

सोलापूर : प्रशासन आणि सामान्य जनता यांच्यातील अंतर कमी करून महसूल विभाग अधिक लोकाभिमुख करण्याच्या उद्देशाने, उत्तर सोलापूर येथील मौजे सोरेगाव येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान’अंतर्गत ‘समाधान शिबिराचे’ अतिशय उत्साहात आयोजन करण्यात आले. या शिबिरात नागरिकांच्या प्रलंबित महसुली प्रश्नांचा जागेवरच निपटारा करण्यात आल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.

महसूल प्रशासन अधिक पारदर्शक, गतिमान आणि लोकाभिमुख व्हावे, हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. सोरेगाव येथील शिबिरामध्ये जमिनीच्या नोंदी, प्रलंबित फेरफार, सातबारा उतारा दुरुस्ती, तसेच उत्पन्न व इतर दाखल्यांशी संबंधित अर्जांची थेट स्वीकृती करण्यात आली. अनेक तांत्रिक अडचणींमुळे रखडलेली कामे या एकाच व्यासपीठावर पूर्ण करण्यात आल्याने नागरिकांचा वेळ आणि हेलपाटे वाचले आहेत.

या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाला स्थानिक लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी उपस्थित राहून नागरिकांशी संवाद साधला. यामध्ये प्रामुख्यान उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, तर सोलापूर तालुक्याचे तहसीलदार निलेश पाटील,हद्दवाढ भागातील नगरसेवक , राजशेखर पाटील, सत्यजित वाघमोडे, मधुसूदन जंगम, दीपक जमादार , व्हीव्हीपी कॉलेज चे संस्थापक नाना चव्हाण, महसूल अधिकारी देशमुख या मान्यवरांसह परिसरातील शेतकरी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आमदार सुभाष देशमुख यांनी देखील या उपक्रमाचे कौतुक केले असून, “प्रशासन जनतेच्या दारी” नेण्याच्या या प्रयत्नामुळे ग्रामीण भागातील सामान्य माणसाला मोठा दिलासा मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले. सोशल मीडियाच्या माध्यमातूनही त्यांनी या शिबिराच्या यशाबद्दल समाधान व्यक्त केले आहे. हे शिबिर केवळ अर्ज गोळा करण्यासाठी नसून, नागरिकांच्या समस्यांचे त्वरित निराकरण करण्यासाठी एक ‘सिंगल विंडो’ सिस्टिम म्हणून प्रभावी ठरले आहे. यामुळे महसूल विभागाच्या कार्यपद्धतीवर नागरिकांनी विश्वास व्यक्त केला आहे.

Previous Post

सोलापुरात पोलिसांचा ‘सर्जिकल स्ट्राईक’! तीन ऑर्केस्ट्रा बारवर धडक कारवाई, ९१ जणांवर गुन्हे दाखल

Next Post

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीसाठी १८०० पोलीसांचा बंदोबस्त तैनात.

Related Posts

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग
सोलापूर जिल्हा

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

July 27, 2026
कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या
सोलापूर जिल्हा

कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

July 27, 2026
भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क
सोलापूर जिल्हा

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा
सोलापूर जिल्हा

कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

July 27, 2026
रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन
सोलापूर जिल्हा

रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

July 27, 2026
गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..
सोलापूर जिल्हा

गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..

July 27, 2026
Next Post
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीसाठी १८००  पोलीसांचा बंदोबस्त तैनात.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीसाठी १८०० पोलीसांचा बंदोबस्त तैनात.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

July 27, 2026
कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

July 27, 2026
भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025