सोलापूर: सोलापूर शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त निघणाऱ्या मिरवणुका शांततेत आणि निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त कार्यालयाने मिरवणूक मार्गावर आणि शहरात मोठ्या प्रमाणावर पोलीस फौजफाटा तैनात केला आहे.या बंदोबस्ताचा मुख्य उद्देश कायदा व सुव्यवस्था राखणे आणि नागरिकांना सुरक्षित वातावरणात सण साजरा करता येणे हा आहे. अशी माहिती पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी दिली आहे.
असा असणार पोलिसांचा बंदोबस्त
- पोलीस उप आयुक्त ; ०३
- सहाय्यक पोलीस आयुक्त ; ०७
- पोलीस निरीक्षक ; २४
- सपोनि / पोसई ; ६१
- पोलीस अंमलदार ; ९९५
- होमगार्ड ; ६००
- एस. आर. पी. एफ. ; ०१ कंपनी










