Sunday, June 7, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष महेश मुद्दा यांचे प्रतिपादन

SOLAPUR MIRROR by SOLAPUR MIRROR
April 18, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष महेश मुद्दा यांचे प्रतिपादन
0
SHARES
23
VIEWS

सोलापूर :  सोलापुरात सुरू झालेली विमानसेवा आणि प्रस्तावित आयटी पार्क यामुळे शहराच्या विकासाला मोठी चालना मिळणार असून आयटीसह विविध उद्योगांच्या वाढीसाठी नवे दालन खुले होईल, असा विश्वास बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष महेश मुद्दा यांनी व्यक्त केला.बिल्डर असोसिएशन ऑफ इंडियाच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर ते पहिल्यांदाच सोलापूर दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांचा सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने  सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे यांच्या हस्ते  मुद्दा यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी उमा मुद्दा, बिल्डर्स असोसिएशनचे माजी राज्याध्यक्ष दत्ता मुळे, संघाचे खजिनदार किरण बनसोडे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. 

       मुद्दा पुढे म्हणाले की, सोलापूरबद्दल जे ऐकले होते त्यापेक्षा शहराचे वातावरण अधिक सकारात्मक आणि विकासाभिमुख असल्याचे प्रत्यक्ष पाहून समाधान वाटले. विमानसेवेच्या माध्यमातून सोलापूरचा देश-विदेशाशी संपर्क वाढेल, परिणामी गुंतवणूक आणि उद्योगांची वाढ होईल. संपर्काचे जाळे मजबूत झाल्यास आयटी उद्योगांसह इतर क्षेत्रांमध्येही मोठा विस्तार अपेक्षित आहे.

        ते म्हणाले की, इंटरनेट आणि आधुनिक तंत्रज्ञानामुळे जग जवळ आले असून नव्या पिढीला नवकल्पना आणि तंत्रज्ञानाचा मोठा फायदा होणार आहे. यामुळे शहरात आर्थिक आणि सामाजिक परिवर्तन घडण्यास मदत होईल. सोलापूर भविष्यात झपाट्याने प्रगती करणारे शहर म्हणून ओळख निर्माण करेल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.

सोलापूर दौऱ्यादरम्यान त्यांनी महापालिका आयुक्त तसेच विविध बिल्डर्स यांच्या प्रकल्पांना भेट दिली. शहरातील विकासकामे आणि प्रकल्प पाहून समाधान झाल्याचे त्यांनी सांगितले.

           पत्रकारांच्या भूमिकेबाबत बोलताना ते म्हणाले की, समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यात माध्यमांचे योगदान महत्त्वाचे आहे. पत्रकारांच्या माध्यमातून समाजात सुधारणा घडतात आणि जनजागृती होते. सोलापूर श्रमिक पत्रकार संघाचे कार्य कौतुकास्पद असल्याचेही त्यांनी नमूद केले.

       कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संगमेश जेऊरे यांनी केले, तर उपाध्यक्ष आफताब शेख यांनी आभार मानले. या प्रसंगी शहरातील विविध वृत्तपत्रे व वृत्तवाहिन्यांचे पत्रकार, कॅमेरामन मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीसाठी १८०० पोलीसांचा बंदोबस्त तैनात.

Next Post

मोफत उपचारासाठी लाच मागणे भोवले: डॉक्टर आणि आरोग्य मित्रावर एसीबीची कारवाई

Related Posts

मुळेगाव तांड्यावर पोलिसांचा धडक छापा; ७.४७ लाखांचा हातभट्टी साहित्याचा नाश
सोलापूर जिल्हा

मुळेगाव तांड्यावर पोलिसांचा धडक छापा; ७.४७ लाखांचा हातभट्टी साहित्याचा नाश

June 6, 2026
बॅगच्या क्षेत्रातील नामांकित ब्रँड ‘अक्षय बॅग’; सोलापूरकरांसाठी दर्जेदार उत्पादनांची पर्वणी
सोलापूर जिल्हा

बॅगच्या क्षेत्रातील नामांकित ब्रँड ‘अक्षय बॅग’; सोलापूरकरांसाठी दर्जेदार उत्पादनांची पर्वणी

June 6, 2026
‘लोकनाथ’ मीडिया चषक २०२६ ची ट्रॉफी अनावरण
सोलापूर जिल्हा

‘लोकनाथ’ मीडिया चषक २०२६ ची ट्रॉफी अनावरण

June 6, 2026
पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते जिल्हा परिषदेत शिवस्वराज्य दिन उत्साहात..
सोलापूर शहर

पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते जिल्हा परिषदेत शिवस्वराज्य दिन उत्साहात..

June 6, 2026
सोलापूरात शिवराज्याभिषेक दिन शिवरायांच्या जयघोषात निनादले सोलापूर..
सोलापूर जिल्हा

सोलापूरात शिवराज्याभिषेक दिन शिवरायांच्या जयघोषात निनादले सोलापूर..

June 6, 2026
गोकुळ कारखान्याविरोधातील शेतकऱ्यांचा लढा तीव्र; १२ व्या दिवशीही ठिय्या आंदोलन कायम
सोलापूर जिल्हा

गोकुळ कारखान्याविरोधातील शेतकऱ्यांचा लढा तीव्र; १२ व्या दिवशीही ठिय्या आंदोलन कायम

June 5, 2026
Next Post
मोफत उपचारासाठी लाच मागणे भोवले: डॉक्टर आणि आरोग्य मित्रावर एसीबीची कारवाई

मोफत उपचारासाठी लाच मागणे भोवले: डॉक्टर आणि आरोग्य मित्रावर एसीबीची कारवाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुळेगाव तांड्यावर पोलिसांचा धडक छापा; ७.४७ लाखांचा हातभट्टी साहित्याचा नाश

मुळेगाव तांड्यावर पोलिसांचा धडक छापा; ७.४७ लाखांचा हातभट्टी साहित्याचा नाश

June 6, 2026
बॅगच्या क्षेत्रातील नामांकित ब्रँड ‘अक्षय बॅग’; सोलापूरकरांसाठी दर्जेदार उत्पादनांची पर्वणी

बॅगच्या क्षेत्रातील नामांकित ब्रँड ‘अक्षय बॅग’; सोलापूरकरांसाठी दर्जेदार उत्पादनांची पर्वणी

June 6, 2026
‘लोकनाथ’ मीडिया चषक २०२६ ची ट्रॉफी अनावरण

‘लोकनाथ’ मीडिया चषक २०२६ ची ट्रॉफी अनावरण

June 6, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025