Monday, July 27, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

मंद्रूप येथील शेततळ्यात बुडून दोन शाळकरी मुलांचा दुर्दैवी मृत्यू

Solapur Mirror by Solapur Mirror
May 18, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
मंद्रूप येथील शेततळ्यात बुडून दोन शाळकरी मुलांचा दुर्दैवी मृत्यू
0
SHARES
752
VIEWS

मंद्रूप नाईक नगर तांड्यावर शोककळा; पोहण्यासाठी गेलेल्या चिमुकल्यांचा काळाने घेतला घाला

सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रूप नाईक नगर तांडा येथे अत्यंत दुर्दैवी घटना घडली असून शेततळ्यात बुडून दोन शाळकरी मुलांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून गावावर शोककळा पसरली आहे.समर्थ मोहन चव्हाण (वय १२) आणि ओंकार रमेश चव्हाण (वय १०) अशी मृत्यूमुखी पडलेल्या दोन्ही मुलांची नावे आहेत. दोघेही मंद्रूप येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षण घेत होते आणि अत्यंत निरागस व खेळकर स्वभावाचे असल्याने गावात सर्वांच्या परिचयाचे होते.

त्यांच्या अकाली निधनाने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित मुलांचे आई-वडील नेहमीप्रमाणे कामासाठी शेतात गेले होते. दुपारच्या सुमारास दोन्ही मुले खेळत खेळत आपल्या शेताजवळ गेली. त्यानंतर त्यांनी शेततळ्यात पोहण्यासाठी प्रवेश केला. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही खोल पाण्यात गेले आणि त्यांचा बुडून मृत्यू झाला.सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आली. बराच वेळ मुले घरी न आल्याने आई-वडिलांनी त्यांचा शोध सुरू केला. गावातील नागरिकांनीही शोधमोहीम हाती घेतली.

दरम्यान शेततळ्याजवळ चप्पल आणि कपडे आढळून आल्याने संशय बळावला. त्यानंतर ग्रामस्थांनी पाण्यात शोध घेतला असता दोन्ही मुलांचे मृतदेह आढळून आले.घटनेची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली. नातेवाईकांनी आणि ग्रामस्थांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. आई-वडिलांचा आक्रोश पाहून अनेकांच्या डोळ्यांत अश्रू तरळले. संपूर्ण तांड्यावर शोकमय वातावरण निर्माण झाले होते.या घटनेनंतर ग्रामीण भागातील शेततळी सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. अनेक शेततळ्यांभोवती संरक्षण भिंत, जाळी किंवा इशारा फलक नसल्यामुळे लहान मुलांच्या जीवाला धोका निर्माण होत असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.ग्रामस्थांनी प्रशासनाकडे शेततळ्यांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

विशेषतः उन्हाळ्याच्या दिवसांत मुले पोहण्यासाठी किंवा खेळण्यासाठी शेततळ्याकडे जात असल्याने पालकांनीही अधिक काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.घटनेची माहिती मिळताच गावातील सरपंच रामसेवक तसेच पंढरपूर पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले. या घटनेमुळे मंद्रूप परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Previous Post

राजू शेट्टी यांच्या शक्तीपीठ महामार्गाला माढ्यात तीव्र विरोध ; “एक इंचही जमीन देणार नाही”चा निर्धार

Next Post

पर्यावरणपूरक संदेश देत महापौरसह उपमहापौर ई-बाईकवरून महापालिकेत दाखल

Related Posts

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क
सोलापूर जिल्हा

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा
सोलापूर जिल्हा

कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

July 27, 2026
रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन
सोलापूर जिल्हा

रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

July 27, 2026
गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..
सोलापूर जिल्हा

गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..

July 27, 2026
केगावच्या बिग सी कॉलेजमध्ये ; बायोमेडिकल इंजिनिअरिंगच्या ६३ जागांसाठी प्रवेश सुरु.
सोलापूर जिल्हा

केगावच्या बिग सी कॉलेजमध्ये ; बायोमेडिकल इंजिनिअरिंगच्या ६३ जागांसाठी प्रवेश सुरु.

July 27, 2026
उत्कृष्ट नियोजनाला ; मुख्यमंत्र्यांकडून जिल्हा परिषदेचे कौतुक..
सोलापूर जिल्हा

उत्कृष्ट नियोजनाला ; मुख्यमंत्र्यांकडून जिल्हा परिषदेचे कौतुक..

July 26, 2026
Next Post
पर्यावरणपूरक संदेश देत महापौरसह उपमहापौर  ई-बाईकवरून महापालिकेत दाखल

पर्यावरणपूरक संदेश देत महापौरसह उपमहापौर ई-बाईकवरून महापालिकेत दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

July 27, 2026
रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

July 27, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025