Monday, July 27, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

पंढरपुरात मंचर ग्रामस्थांच्या वारकरी धर्मशाळेचे लोकार्पण; ‘वारकरी सेवेची परंपरा अधिक बळकट होणार’

Solapur Mirror by Solapur Mirror
July 4, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
पंढरपुरात मंचर ग्रामस्थांच्या वारकरी धर्मशाळेचे लोकार्पण; ‘वारकरी सेवेची परंपरा अधिक बळकट होणार’
0
SHARES
17
VIEWS

सोलापूर/पंढरपूर, : आषाढी वारीच्या भक्तिमय वातावरणात मंचर ग्रामस्थ वारकरी सेवा मंडळाच्या वतीने श्रीक्षेत्र पंढरपूर येथे उभारण्यात आलेल्या सुसज्ज वारकरी धर्मशाळेच्या नव्या इमारतीचे रविवारी लोकार्पण करण्यात आले. या सोहळ्याला महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार प्रमुख उपस्थित होत्या. उद्घाटनानंतर त्यांनी वारकरी बांधवांसमवेत सहभोजनाचा लाभ घेत विठ्ठल-रुक्मिणीच्या चरणी राज्याच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली.

यावेळी बोलताना सुनेत्रा पवार म्हणाल्या की, मंचर आणि आंबेगाव तालुक्यातील ग्रामस्थांनी लोकसहभागातून उभारलेली ही धर्मशाळा हजारो वारकऱ्यांसाठी हक्काचा, सुरक्षित आणि सुसज्ज निवारा ठरेल. ही वास्तू केवळ मुक्कामाची सुविधा नसून भक्ती, सेवा, संस्कार आणि वारकरी परंपरेचे प्रेरणास्थान ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी मंचर ग्रामस्थ वारकरी सेवा मंडळाचे संस्थापक ह.भ.प. मारुती धोंडीबा मोरडे (अण्णा गुरुजी) यांच्या कार्याचा त्यांनी विशेष गौरव केला. अनेक वर्षांपूर्वी त्यांनी वारकरी सेवेचे रोवलेले बीज आज वटवृक्षात रूपांतरित झाले असून, त्यांनी पाहिलेले स्वप्न प्रत्यक्षात साकार झाल्याचा आनंद त्यांनी व्यक्त केला. मंचर आणि आंबेगाव तालुक्यातील भाविकांसाठी पंढरपूरमध्ये कायमस्वरूपी हक्काचे घर निर्माण झाल्याचेही त्यांनी नमूद केले.

या धर्मशाळेच्या उभारणीत ज्येष्ठ नेते दिलीप वळसे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामस्थ, वारकरी सेवा मंडळ, देणगीदार आणि पदाधिकाऱ्यांनी केलेल्या योगदानाचे त्यांनी कौतुक केले. या वास्तूची स्वच्छता, पावित्र्य आणि देखभाल राखणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले. यावेळी पंढरपूरच्या विकासासाठी ज्येष्ठ नेते दिलीप वळसे-पाटील यांनी मांडलेल्या दूरदृष्टीचाही त्यांनी उल्लेख केला. वारकऱ्यांना दर्जेदार, सुरक्षित आणि आधुनिक सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी पालखी मार्ग, पायाभूत सुविधा आणि वारकरी-केंद्रित विकासकामांवर विशेष भर देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या स्वप्नातील उर्वरित विकासकामे पूर्ण करण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सांगितले की, पंढरपूरच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासनाने सुमारे ₹४,००० कोटींच्या विकास आराखड्याला मंजुरी दिली आहे. या आराखड्यात मंदिर परिसराचा विकास, प्रदक्षिणा मार्गाचे सुशोभीकरण, चंद्रभागा घाटाचे आधुनिकीकरण, पालखी तळांची उभारणी, रस्त्यांचे सक्षमीकरण तसेच इतर पायाभूत सुविधा उभारण्याची कामे प्रस्तावित आहेत. या विकासकामांमुळे वारकऱ्यांना अधिक सुरक्षित, स्वच्छ आणि सुलभ सुविधा उपलब्ध होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने सर्व आवश्यक नियोजन केले असून, प्रत्येक वारकऱ्याची वारी सुखकर, सुरक्षित आणि मंगलमय व्हावी, हीच विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना असल्याचेही त्यांनी सांगितले.

Previous Post

व्हीआयपी प्रोटोकॉल बाजूला ठेवत सुनेत्रा पवार वारकऱ्यांच्या पंगतीत

Next Post

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन

Related Posts

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग
सोलापूर जिल्हा

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

July 27, 2026
कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या
सोलापूर जिल्हा

कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

July 27, 2026
भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क
सोलापूर जिल्हा

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा
सोलापूर जिल्हा

कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

July 27, 2026
रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन
सोलापूर जिल्हा

रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

July 27, 2026
गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..
सोलापूर जिल्हा

गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..

July 27, 2026
Next Post
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

July 27, 2026
कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

July 27, 2026
भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025