सोलापूर ; आषाढी वारीदरम्यान हृदयविकाराचा तीव्र झटका आलेल्या एका वारकऱ्याला तातडीने एअर ॲम्ब्युलन्सद्वारे पंढरपूरहून सोलापुरात हलविण्यात आले. वेळेत उपचार सुरू झाल्याने संबंधित वारकऱ्याच्या प्रकृतीत सुधारणा होण्याची आशा व्यक्त करण्यात येत असून, या घटनेत शासनाच्या तत्पर आरोग्य यंत्रणेचे दर्शन घडले.

सोलापुरातील रुग्णालयात दाखल झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः रुग्णालयात जाऊन वारकऱ्याची भेट घेतली. वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून त्यांनी प्रकृतीची सविस्तर माहिती जाणून घेत उपचारांमध्ये कोणतीही त्रुटी राहू नये, यासाठी सर्वोत्तम वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या. मुख्यमंत्र्यांनी वारकऱ्याच्या कुटुंबीयांशी संवाद साधून त्यांना धीर दिला. शासनाकडून आवश्यक ती सर्व मदत केली जाईल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.












