पंढरपूर : जिल्ह्यातील पालखी मार्गासह पंढरपूर येथील आषाढी वारीत भाविकांना सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने उत्कृष्ट नियोजन केल्याबद्दल जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दीपक वैद्य, उपाध्यक्ष इंद्रजित पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांच्यासह अन्य पदाधिकारी व अधिकाऱ्यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कौतुक करीत त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली. आषाढी वारीनिमित्त श्री शासकीय विठ्ठल-रुक्मिणीच्या महापूजेसाठी पंढरपूर दौऱ्यावर आलेले मुख्यमंत्री फडणवीस यांचे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वैद्य व उपाध्यक्ष पवार यांनी स्वागत केले. त्यावेळी जिल्हा परिषदेने भाविकांसाठी राबविलेल्या विविध उपक्रमांची माहिती घेत याच्या उत्कृष्ट नियोजनाबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांनी कौतुक केले.
मुख्यमंत्री फडणवीस यांचे स्वागत करताना सामाजिक बांधिलकीची जाणीव अधिक दृढ झाली आणि समाजसेवेच्या कार्यात अधिक जोमाने कार्य करण्याची नवी उर्मी व नवचैतन्य मिळाले, अशी भावना जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष इंद्रजित पवार यांनी व्यक्त केली. त्यांच्यासमवेत आमदार राजेंद्र राऊत, भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य शहाजी पवार, उपस्थित होते