सोलापूर :- सोलापूर जिल्हयातील सर्व माजी सैनिकांना कळविण्यात येते की, माजी सैनिकांना त्यांच्या आवडीनुसार योग्य तो कौशल्य विकास अभ्यासक्रम निवडता यावा आणि त्यांचे प्रभावी पुनर्वसन व्हावे यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या प्रांगणात दिनांक 05 मार्च 2026 रोजी सकाळी 11 ते दुपारी 02 या कालावधीत जिल्हा स्तरावर समुपदेशन शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे.

या शिबिरामध्ये जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सोलापूर येथील तज्ञ समुपदेशक/अधिकारी उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत.तरी जिल्हयातील जास्तीत जास्त माजी सैनिकांनी सदर समुपदेशन शिबिराकरीता उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर मिलिंद देवदत्त तुंगार यांनी केले आहे.












