Monday, July 27, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

ब्युटी पार्लर चालवणारी तरुणी अन् तो प्रियकर; ‘टॅब’ वाचवण्यासाठी रचला सामूहिक अत्याचाराचा खोटा बनाव, दोघेही गजाआड!.

Solapur Mirror by Solapur Mirror
March 23, 2026
in Uncategorized
0
ब्युटी पार्लर चालवणारी तरुणी अन् तो प्रियकर; ‘टॅब’ वाचवण्यासाठी रचला सामूहिक अत्याचाराचा खोटा बनाव, दोघेही गजाआड!.
0
SHARES
18
VIEWS

सोलापूर : प्रियकरावर दाखल असलेल्या गुन्ह्यात कोर्टाने जामीन देण्यास नकार दिल्याने त्याला वाचवण्यासाठी प्रेयसीने चक्क आपल्यावर चार जणांनी सामूहिक अत्याचार केल्याचा बनाव केला; पण पोलिसांनी तपास केल्यानंतर मात्र सारं खोटं असल्याचं स्पष्ट झालं. पोलिसांनी खोटी तक्रार देण्यासाठी आलेली प्रेयसी व तिचा प्रियकर समीर चांदसाब शेख (वय २८, रा. कुमठा) यांच्यावरच उलट गुन्हा दाखल दाखल केला, अशी माहिती पोलिस आयुक्त एम. राज कुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली.

याप्रकरणी दोन्ही आरोपींना रविवारी कोर्टासमोर हजर करण्यात आले. प्रेयसी मुलीचे पदव्यूत्तर पदवीपर्यंत शिक्षण झाले आहे. ती ब्युटीपार्लर चालविते. तिचे आणि आरोपी समीर यांचे २०२२ पासून एकमेकांवर प्रेम आहे. समीर याच्यावर एका मुलीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी डिसेंबर २०२३ रोजी गुन्हा दाखल होऊन अटक झाली. या प्रकरणी त्याला हायकोर्टाने जामीन दिले होते. अपिलात १७ मार्च २०२६ रोजी सुप्रीम कोर्टाने त्यांचा जामीन नामंजूर केले होते. यामुळे समीर पुन्हा जेलमध्ये जाणार होता. यासाठी आरोपी मुलगी आणि समीर यांनी संगनमत करून हा बनाव केला. समीरवर दाखल असलेल्या गुन्ह्यातील साक्षीदारांवर प्रतिमाने अत्याचाराचा आरोप केल्याचे तपासात उघडकीस आले. हा गुन्हा दाखल करून त्यांच्याशी डील करून समीरला सोडवण्याचा त्यांचा प्लॅन होता, असा अंदाज पोलिसांकडून वर्तवण्यात आला. या पत्रकार परिषदेवेळी पोलिस उपायुक्त विजय कबाडे, सहायक पोलिस आयुक्त दिलीप पवार, विजापूर नाका पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दादा गायकवाड, दुपोनि सुशांत वराळे, गुन्हे प्रकटीकरण पथकाचे शीतलकुमार गायकवाड, सपोनि सविता मोरे पाटील उपस्थित होते.

ही कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सविता क्षीरसागर, अप्पा पवार, अजय परदेशी, गणेश शिर्के, सचिन हार, फुटाणे, जाधव, सद्दाम आबादीराजे, अमृत सुरवसे, कोर्सेगाव, समाधान मारकड, राहुल विटकर, स्वप्निल जाधव, संतोष माने आदींनी केली.

प्राथमिक तपासात आम्हाला या प्रकरणी शंका आली होती. यामुळे आम्ही याबाबत तक्रार घेतली नाही; पण नंतर सर्वच चित्र स्पष्ट झाले. अशाप्रकारे कोणी खोटे गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न करू नये. जर असे केल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल.
एम. राजकुमार, पोलिस आयुक्त

Previous Post

श्रमिक पत्रकार संघात आरओ फिल्टर पाणी मशीनचे उद्घाटन

Next Post

पोलिस बॅन्डस्मन पदाच्या लेखी परीक्षेला सुरुवात

Related Posts

आषाढी वारीसाठी आरोग्य विभाग पूर्णपणे सज्ज!
Uncategorized

आषाढी वारीसाठी आरोग्य विभाग पूर्णपणे सज्ज!

July 19, 2026
सोलापूर बार असोसिएशन निवडणुकीचे बिगुल; अध्यक्षपदासाठी दोन दिग्गज मैदानात
Uncategorized

सोलापूर बार असोसिएशन निवडणुकीचे बिगुल; अध्यक्षपदासाठी दोन दिग्गज मैदानात

July 11, 2026
शहर पोलिस दलातील चार अधिकाऱ्यांना पदोन्नती; नव्या जबाबदाऱ्यांची धुरा
Uncategorized

शहर पोलिस दलातील चार अधिकाऱ्यांना पदोन्नती; नव्या जबाबदाऱ्यांची धुरा

June 24, 2026
‘एकही मत वाया नको’ : राजाभाऊंच्या विजयासाठी शिंदेंचे दूत सोलापुरात सक्रिय
Uncategorized

‘एकही मत वाया नको’ : राजाभाऊंच्या विजयासाठी शिंदेंचे दूत सोलापुरात सक्रिय

June 18, 2026
मतदानात ‘उत्तर सोलापूर’ अव्वल तर ‘पंढरपूर’ संथ; पहिल्या टप्प्यात जिल्ह्यात ११.८५ टक्के मतदान
Uncategorized

मतदानात ‘उत्तर सोलापूर’ अव्वल तर ‘पंढरपूर’ संथ; पहिल्या टप्प्यात जिल्ह्यात ११.८५ टक्के मतदान

June 18, 2026
पोलीस आयुक्तांच्या उपस्थितीत जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांचे स्वागत
Uncategorized

पोलीस आयुक्तांच्या उपस्थितीत जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांचे स्वागत

June 15, 2026
Next Post
पोलिस बॅन्डस्मन पदाच्या लेखी परीक्षेला सुरुवात

पोलिस बॅन्डस्मन पदाच्या लेखी परीक्षेला सुरुवात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

July 27, 2026
रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

July 27, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025