Tuesday, March 31, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

जिल्हा परिषदेच्या इतिहासात पहिल्यांदाच एका पक्षाला मोठे बहुमत ; पालकमंत्री जयकुमार गोरे

राजेश भोई by राजेश भोई
March 18, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
जिल्हा परिषदेच्या इतिहासात पहिल्यांदाच एका पक्षाला मोठे बहुमत ; पालकमंत्री जयकुमार गोरे
0
SHARES
38
VIEWS

सोलापूर ; सोलापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी बार्शीचे दीपक वैद्य आणि उपाध्यक्षपदी मार्डीचे इंद्रजीत पवार यांची निवड करण्यात आली. गेल्या अनेक दिवसांपासून जिल्हा परिषदेचा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार बंद लिफाफामध्ये अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची नावे दाखल झाल्यानंतर अर्ज सादर करावयाच्या दिवशी बुधवारी सकाळी पावणे बारा वाजता भाजप जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण आणि चेतन सिंह केदार यांच्यासह गटनेत्या रश्मी बागल, नेताजी खंडागळे, बालाजी नरोटे आदींनी पुढाकार घेत अध्यक्षपदासाठी दीपक वैद्य तर उपाध्यक्ष पदासाठी इंद्रजीत पवार या दोघांचे अर्ज दाखल केले. यावेळी व्यासपीठावर उपजिल्हाधिकारी तथा साहाय्यक निवडणूक निर्णयाधिकारी संतोष देशमुख, महसूल उपजिल्हाधिकारी लक्ष्मण कसेकर, तहसीलदार पूनम दंडीले यांनी स्वीकारले. यावेळी अध्यक्षपदाच्या अर्जासाठी बालाजी नरोटे सूचक तर नेताजी खंडागळे अनुमोदक राहिले तर उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांच्या अर्जासाठी पृथ्वीराज माने हे सूचक तर चेतनसिंह केदार हे अनुमोदक राहिले. दुपारी बारा वाजता अर्ज दाखल केल्यानंतर भाजपचे नेते काहीकाळ बालाजी सरोवर येथे चहापानासाठी दाखल झाले.

दरम्यान, सभेच्या निर्धारित वेळेत निवडणूक निर्णय अधिकारी तथा पिठासीन अधिकारी जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद हे यशवंतराव सभागृहात दाखल झाले. त्यानंतर सभेच्या वेळेनुसार नूतन सदस्य दुपारी २ वाजण्याच्या सुमारास सभागृहात येण्यास सुरुवात झाली. आलेल्या सर्व सदस्यांच्या सह्या प्रशासनाने मस्टरवर घेतल्या. तदनंतर भाजपचे प्रमुख नेते आणि अध्यक्ष उपाध्यक्ष पदाचे उमेदवार सभागृहात दाखल झाले. निर्धारित वेळेनुसार सभेची सुरुवात राष्ट्रगीत व राज्यगीताने झाली. त्यानंतर निवडणुकीचे कामकाज उप जिल्हाधिकारी संतोष देशमुख यांनी सुरू केले. या कामकाजात पीठासीनाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी अध्यक्ष निवडीचे कामकाज सुरू केले. यावेळी अध्यक्षपदासाठी दीपक वैद्य यांचा एकमेव तर उपाध्यक्ष पदासाठी इंद्रजीत पवार यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने ही निवडणूक बिनविरोध जाहीर होत असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा पिठासीन अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी जाहीर केले. यावेळी सभागृहात टाळ्यांचा गजर झाला. तदनंतर पिठाासीन अधिकारी कुमार आशीर्वाद तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी नूतन अध्यक्ष दीपक वैद्य आणि उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.

एकंदर सोलापूर झेडपी अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी ‘सव्वा-सव्वा वर्ष’ असा फॉर्म्युला ठरवण्यात आला असून अध्यक्षपदासाठी बार्शीचे दीपक वैद्य तर उपाध्यक्षपदासाठी उत्तर सोलापूरचे इंद्रजीत पवार यांची बिनविरोध निवड झाल्याने बार्शी तालुक्यातील भाजपच्या कार्यकर्त्यांनी जिल्हा परिषद समोर एक जल्लोष केला. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण यांनी माहिती देताना सांगितले की, अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाचा कार्यकाळ ‘सव्वा-सव्वा वर्ष’ असा राहणार असून त्यानंतर इतर सदस्यांना संधी दिली जाणार आहे. या निर्णयाला संबंधित सदस्यांनी संमती दिली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले

Previous Post

​बार्शी आणि उत्तर सोलापूरचा डंका! दीपक वैद्य – इंद्रजीत पवार जोडीकडे सोलापूर जिल्हा परिषदेची धुरा.

Next Post

सत्ता मिळाली पण माणुसकीही जपली! आमदार सचिन कल्याणशेट्टींच्या ‘त्या’ कृतीने सोलापूर जिल्हा परिषदेत जिंकली सर्वांची मने.

Related Posts

२२ एप्रिल रोजी झेडपीची पहिली सर्वसाधारण सभा
सोलापूर जिल्हा

२२ एप्रिल रोजी झेडपीची पहिली सर्वसाधारण सभा

March 30, 2026
“पुरुषांना अनेक पर्याय, मग महिलांनी काय करायचे?” – स्वीकृत नगरसेवक मनीष केत यांचा महापालिकेत सवाल.
सोलापूर जिल्हा

“पुरुषांना अनेक पर्याय, मग महिलांनी काय करायचे?” – स्वीकृत नगरसेवक मनीष केत यांचा महापालिकेत सवाल.

March 30, 2026
कोल्हापूरची अमृता पुजारी डबल महाराष्ट्र केसरी
सोलापूर जिल्हा

कोल्हापूरची अमृता पुजारी डबल महाराष्ट्र केसरी

March 30, 2026
मोहोळमध्ये एसीबीचा मोठा ‘सापळा’; १० हजारांची लाच घेताना तलाठी सुदर्शन जाधव रंगेहाथ अटक!
सोलापूर जिल्हा

मोहोळमध्ये एसीबीचा मोठा ‘सापळा’; १० हजारांची लाच घेताना तलाठी सुदर्शन जाधव रंगेहाथ अटक!

March 29, 2026
सोलापूरच्या औद्योगिक वसाहतींमध्ये विकासकामांसाठी ५६ कोटींचा निधी मंजूर
सोलापूर जिल्हा

सोलापूरच्या औद्योगिक वसाहतींमध्ये विकासकामांसाठी ५६ कोटींचा निधी मंजूर

March 29, 2026
महात्मा बसवेश्वर जन्मोत्सव महामंडळ अध्यक्षपदी केंगनाळकर तर विजय कुलथे कार्याध्यक्ष
सोलापूर जिल्हा

महात्मा बसवेश्वर जन्मोत्सव महामंडळ अध्यक्षपदी केंगनाळकर तर विजय कुलथे कार्याध्यक्ष

March 29, 2026
Next Post
सत्ता मिळाली पण माणुसकीही जपली! आमदार सचिन कल्याणशेट्टींच्या ‘त्या’ कृतीने सोलापूर जिल्हा परिषदेत जिंकली सर्वांची मने.

सत्ता मिळाली पण माणुसकीही जपली! आमदार सचिन कल्याणशेट्टींच्या 'त्या' कृतीने सोलापूर जिल्हा परिषदेत जिंकली सर्वांची मने.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

२२ एप्रिल रोजी झेडपीची पहिली सर्वसाधारण सभा

२२ एप्रिल रोजी झेडपीची पहिली सर्वसाधारण सभा

March 30, 2026
“पुरुषांना अनेक पर्याय, मग महिलांनी काय करायचे?” – स्वीकृत नगरसेवक मनीष केत यांचा महापालिकेत सवाल.

“पुरुषांना अनेक पर्याय, मग महिलांनी काय करायचे?” – स्वीकृत नगरसेवक मनीष केत यांचा महापालिकेत सवाल.

March 30, 2026
कोल्हापूरची अमृता पुजारी डबल महाराष्ट्र केसरी

कोल्हापूरची अमृता पुजारी डबल महाराष्ट्र केसरी

March 30, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025