सोलापूर: विजापूर रोडवरील ए. जी. पाटील पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूट मध्ये जागृती महिला विचार मंच अंतर्गत विद्यार्थिनींसाठी नवरात्र महोत्सव निमित्त गरबा व दांडिया नृत्य स्पर्धेचे आयोजन महाविद्यालयातील मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागात करण्यात आले होते. या स्पर्धेस महिला शिक्षक वर्ग व विद्यार्थीनीकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. एकूण बारा ग्रुप्सनी ग्रुप डान्स सादर केले.
स्पर्धेच्या उदघाटनासाठी संस्थेचे अध्यक्ष श्री एस ए पाटील, संस्थेचे कॅम्पस डायरेक्टर व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एम ए चौगुले, उपप्राचार्य श्री एस के मोहिते, ए. जी. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, सोलापूर चे प्राचार्य डॉ व्ही व्ही पोतदार, स्पर्धेचे परीक्षक सौ. पद्मावती शेखर, जागृती मंचाच्या कॉर्डिनेटर सौ एल एस बिराजदार, व विभागावर महिला प्रतिनिधी उपस्थित होते.
स्पर्धेची सुरुवात कु. सायली जाधव, द्वितीय वर्ष इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग च्या गोंधळ गीतेने झाले. ग्रुप डान्स मध्ये प्रथम क्रमांक अंकिता चव्हाण अँड ग्रुप, तृतीय वर्ष कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, द्वितीय क्रमांक भक्ती जाधव अँड ग्रुप, द्वितीय वर्ष कॉम्प्युटर इंजिनिअरिंग आणि तृतीय क्रमांक श्रुती नडगिरी अँड ग्रुप, द्वितीय वर्ष इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. व्हि एम शेटे व कु. के ए शेख यांनी केले. ग्रुपचे सादरीकरणाचे निवेदन व नियोजन कु. साक्षी उप्पीन, कु. हुमा सय्यद, कु. स्वरा गायकवाड व कु. श्रावणी सावंत यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सौ. एस पी डोके, कु. एस व्ही मरेड्डी, कु. व्हि एम शेटे, कु. के ए शेख, कु. ए जी सोलनकर, कु. जे सी सचदेव व सर्व महिला शिक्षकांचे सहकार्य लाभले.







