सोलापूर : नववर्षात सोलापूरकरांना रेल्वेने धक्का देण्याचा निर्णय घेतला आहे. सोलापूर-पुणे या अत्यंत महत्वाच्या मार्गावर धावणाऱ्या हुतात्मा आणि इंद्रायणी एक्स्प्रेस या दोन्ही प्रमुख गाड्या तब्बल १० दिवसांसाठी (१५ ते २५ जानेवारी) रद्द करण्यात आल्या आहेत. पुणे विभागातील दौंड-काष्टी दुहेरीकरण कामासाठी घेण्यात येणाऱ्या मोठ्या ट्रैफिक व पॉवर ब्लॉकमुळे हा निर्णय घेण्यात आहे. त्यामुळे नववर्षात पुण्याला जाणाऱ्या हजारो प्रवाशांचे संपूर्ण नियोजन कोलमडणार आहे.
नेहमीची सोलापूरकरांची भरवशाची रेल्वे-जोडणी मानल्या जाणाऱ्या या दोन्ही गाड्या दहा दिवस बंद राहणार असल्याने सोलापूर-पुणे-सोलापूर प्रवास अक्षरशः ठप्प होणार आहे. रोज कामानिमित्त शिक्षणासाठी, उपचारांसाठी किंवा पुण्यातील शासकीय कार्यालयांमध्ये कामानिमित्त जाणारे नागरिक या ब्लॉकमुळे त्रस्त होणार हे निश्चित आहे. ४ ते २५ जानेवारीदरम्यान दौंड-काष्टी विभागात प्रीएनआय आणि एनआय ब्लॉक्स घेण्यात येणार आहेत. २५ जानेवारीला तब्बल ३० तासांचा मेगा ब्लॉक असणार आहे.
- ‘या’ एक्स्प्रेस गाड्या रद्द
- सोलापूर-पुणे-सोलापूर हुतात्मा एक्स्प्रेस १५ ते २५ जानेवारी
- पुणे-सोलापूर-पुणे इंद्रायणी एक्प्रेस १५ ते २५ जानेवारी
- पुणे-सोलापूर-पुणे डेमू एक्स्प्रेस १५ ते २५ जानेवारी
- दादर-साईनगर शिर्डी-दादर एक्प्रेस २१ व २२ जानेवारी
- दादर-साईनगर शिर्डी-दादर २४ व २५ जानेवारी
- दौंड-निजामाबाद एक्स्प्रेस :
- २४ जानेवारी
- निजामाबाद-पुणे एक्स्प्रेस २३ जानेवारी
- पुणे-हरंगुळ-पुणे एक्स्प्रेस २४ व २५ जानेवारी
- पनवेल-नांदेड एक्स्प्रेस २४ व २५ जानेवारी
- नांदेड-पनवेल एक्स्प्रेस २३ व २४ जानेवारी
- हडपसर-सोलापूर डेमू: २४ व २५ जानेवारी
- सोलापूर-पुणे डेमू: २४ व २५ जानेवारी







